---Advertisement---

भारतासाठी कर्दनकाळ ठरू शकतो ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ धाकड फलंदाज, रोहितच्या नेतृत्त्वाखाली खेळलाय

Tim-David
---Advertisement---

आगामी टी20 विश्वचषक 2022 चे बिगूल वाजले असून 16 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना 23 नोव्हेंबरला होईल. तत्पूर्वी भारतीय संघ मायदेशात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा एक क्रिकेटपटू भारतासाठी कर्दनकाळ ठरू शकतो. ऑस्ट्रेलियाचा युवा विस्फोटक फलंदाज टीम डेविड हा तो खेळाडू आहे.

डेविड (Tim David) भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून (India vs Australia) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. कारण डेविडला फक्त भारत दौऱ्यासाठी नव्हे तर आगामी टी20 विश्वचषक 2022 साठीही (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियाच्या संघात निवडले गेले आहे. डेविडच्या लांब लांब फटकेबाजी करण्याच्या क्षमतेमुळे तिला ऑस्ट्रेलियाच्या संघात जागा मिळाली आहे. तो आयपीएलच्या मागील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. या हंगामात त्याने बऱ्याचशा धुव्वादार खेळी खेळल्या होत्या.

मुंबई इंडियन्सकडून केलेय प्रभावी प्रदर्शन
26 वर्षीय डेविडने 2021 मध्येच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. परंतु त्याला फक्त पदार्पणाचा सामना खेळून संघाबाहेर बसवण्यात आले होते. मात्र 2022 मध्ये मुंबई संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला. त्याने या हंगामात 8 सामने खेळताना 37.20 च्या सरासरीने 186 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी 46 धावा इतकी राहिली आहे. तसेच त्याचा स्ट्राईक रेट 216.28 इतका राहिला आहे. विशेष म्हणजे, हे सर्व सामने भारतातच झाले होते.

भारतात आयपीएल खेळल्यामुळे डेविडला भारतीय गोलंदाजांची चांगली पारख झाली आहे. तसेच भारतातील मैदानांचीही त्याला ओळख झाली आहे. त्यामुळे तो भारतीय संघाविरुद्ध खतरनाक सिद्ध होऊ शकतो. याबरोबरच त्याला टी20 क्रिकेटचाही चांगला अनुभव आहे. डेविडने सिंगापूर संघाकडून 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. या 11 सामन्यांमध्ये 47.67 च्या सरासरीने त्याने 429 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 अर्धशतके निघाली आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

ना प्रॅक्टीस ना क्रिकेटच्या चर्चा, फक्त पत्नीसोबत…! सूर्याने सांगितले विस्फोटक फलंदाजीचे रहस्य
टी20 विश्वचषकापूर्वी खूपच बिझी आहे भारतीय संघ; पाहा कधी, कोणाविरुद्ध खेळणार आहे सामने?
शेन बाँड हेड कोच, तर एमआय एमिरेट्सच्या कोचिंग स्टाफमध्ये ‘या’ दिग्गजांचा समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---