भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मोठा विक्रम रचला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम केला. त्याचबरोबर या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ माजली आहे. यामुळेच ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्शला संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. मार्शच्या जागी ऑस्ट्रेलियन संघाने शेफिल्ड शिल्डमध्ये तस्मानियाकडून खेळणाऱ्या ब्यू वेबस्टरचा भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश केला आहे. मिशेल मार्शचा बदली म्हणून ब्यू वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारत ‘अ’ विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेसह रेड बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या अलीकडील चांगल्या कामगिरीमुळे वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला. भारत अ विरुद्धच्या ‘कसोटी’ मालिकेत वेबस्टर हा ऑस्ट्रेलिया अ साठी 72.50 च्या सरासरीने 145 धावा करत मालिकेत दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 20 पेक्षा कमी सरासरीने सात विकेट्सही घेतल्या. 30 वर्षीय ब्यू वेबस्टरला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात स्थान मिळाल्याने आनंद झाला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ही कसोटी दिवस-रात्र कसोटी सामना असेल जो गुलाबी चेंडूने खेळला जाईल. या सामन्यात ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करण्याचे प्रयत्न करेल. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघाची गोलंदाजी आणि फलंदाज दोन्ही मजबूत व्हाव्यात यासाठी संघाने ब्यू वेबस्टरसारख्या खेळाडूचा आपल्या संघात समावेश केला आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ पुढीलप्रमाणे :
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, नॅथन मॅकस्विनी. , स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर
हेही वाचा-
IPL 2025: श्रेयस अय्यर कर्णधार तर मधल्या फळीत मॅक्सवेल-स्टॉइनिस, पाहा पंजाब किंग्जची प्लेइंग 11
IND VS AUS; भारतासाठी इतिहास रचण्यापासून बुमराह 10 विकेट्स दूर, याबाबतीत गाठणार अव्वल स्थान
भारताने आतापर्यंत किती डे-नाईट कसोटी सामने जिंकले? ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा विक्रम