---Advertisement---

भारताने आतापर्यंत किती डे-नाईट कसोटी सामने जिंकले? ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा विक्रम

On: गुरूवार, नोव्हेंबर 28, 2024 9:02 AM
---Advertisement---

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वांना चकित करत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना 295 धावांनी जिंकला. कर्णधार बुमराहची प्रत्येक चाल अचूक होती. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीसाठी संघात सामील झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाची फलंदाजी मजबूत होईल. आता उभय संघांमधील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडच्या मैदानावर खेळवला जाईल. जो दिवस-रात्र कसोटी सामना असेल आणि गुलाबी चेंडूने खेळला जाईल. भारताचा हा पाचवा दिवस-रात्र कसोटी सामना असेल.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने आतापर्यंत एकूण चार दिवस-रात्र कसोटी खेळल्या आहेत. त्यापैकी तीन जिंकल्या आहेत. तर फक्त एकच पराभव पत्करावा लागला आहे. भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांग्लादेश आणि श्रीलंका संघांविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. पण अडचण अशी आहे की टीम इंडिया एकदाच ॲडलेडच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी हरली आहे. जिथे दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

1. पहिली दिवस-रात्र कसोटी
भारतीय संघाने 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध पहिला दिवस-रात्र कसोटी सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला. त्यामध्ये टीम इंडियाने एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात इशांत शर्मा सर्वात मोठा हिरो ठरला होता. ज्यात त्याने एकूण 9 विकेट्स घेतल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

2. दुसरी दिवस-रात्र कसोटी
यानंतर भारताने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेडच्या मैदानावर दुसरी डे-नाईट कसोटी खेळली. ज्यामध्ये भारताला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली होता.

3. तिसरी दिवस-रात्र कसोटी
भारताने 2021 साली अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना खेळला. ज्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 10 गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात इंग्लिश फलंदाज अक्षर पटेलसमोर टिकू शकले नाहीत. त्याने सामन्यात एकूण 11 विकेट घेतल्या. याशिवाय रोहित शर्मानेही या सामन्यात 66 धावांची दमदार खेळी केली.

4. चौथी दिवस-रात्र कसोटी
भारताने 2022 मध्ये बंगळुरूच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध चौथा दिवस-रात्र कसोटी सामना खेळला. ज्यात भारतीय संघाने 238 धावांनी मोठा विजय नोंदवला होता. यामध्ये श्रेयस अय्यरने दमदार कामगिरी केली होती. त्याने सामन्यात 92 आणि 67 धावांची खेळी खेळली आणि त्याच्यामुळेच टीम इंडिया सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. तेव्हा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा होता.

हेही  वाचा-

‘बुमराह लिलावात आला तर किती बोली लागली असती’? अशिष नेहरा म्हणाला, ‘त्याच्यासाठी पूर्ण पर्स….’
हा खेळाडू होणार दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार! संघ मालकाचा मोठा इशारा?
IPL 2025; आयपीएलमधील सर्व 10 संघांचे सर्वात महागडे खेळाडू!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---