भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना शनिवारी पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारताला 8 गडी राखून पराभूत केले. दुसर्या डावात फलंदाजी करताना भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापत झाली. सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने मोहम्मद शमी च्या दुखापतीबद्दल सांगितले.
दुसर्या डावात भारताचे 9 गडी बाद झाले
भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवसा – रात्र सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. संपूर्ण भारतीय संघ दुसर्या डावात फक्त 36 धावावर कोसळला. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजी आक्रमणापुढे भारताच्या एका ही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही. सामन्याच्या दरम्यान दुसर्या डावात भारताचे 9 फलंदाज बाद झाले आणि मोहम्मद शमी दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होवून माघारी परतला.
मोहमद शम्मीच्या दुखापतीबद्दल अजून माहिती नाही
दुसर्या डावात दुखापत झाल्यामुळे मोहमद शमी मैदानावर गोलंदाजी करताना सुद्धा दिसला नाही. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली मोहमद शमी च्या दुखापतीबद्दल म्हणाला, “शमीच्या दुखापतीबद्दल काहीही माहिती नाही, आता त्याला स्कॅनिंगसाठी घेवून जातील. त्याला खूप वेदना होत होत्या,आपला हात सुद्धा उचलू शकत नव्हता. आम्हाला संध्याकाळीच माहिती होईल की काय झालंय.
मोहम्मद शमी दुसर्या सामन्यात खेळण्याबाबत शंका
शमीच्या दुखापतीबद्दल काहीही माहिती नसल्यामुळे दुसर्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. 26 डिसेंबरला ‘बॉक्सिंग डे’ दिवशी मालिकेतील दुसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे खेळला जाईल. भारतीय संघातून अगोदरच वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा दुखापतीमुळे संघातून बाहेर गेला त्यामुळे संघाच्या अडचणीत वाढल्या आहेत.
संबंधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है! टीम इंडियाच्या वाईट प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
– टीम इंडियाचा लाजीरवाणा पराक्रम आणि माजी खेळाडूंच्या तिखट प्रतिक्रिया, चाहत्यांकडूनही मीम्सचा भडीमार