आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 सुरू होण्यासाठी फक्त 10 दिवस उरले आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ही पाच सामन्यांची कसोटी मालिका दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात गेल्या दोन मालिका जिंकल्या आहेत. अशा परिस्थितीत यजमान संघावर मालिका जिंकण्याचे दडपण असेल. पण त्याआधी या मालिकेच्या इतिहासात भारताच्या दोन महान खेळाडूंचा काय विक्रम आहे हे जाणून घेऊयात. ते दोन खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत.
विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगले क्रिकेट खेळले आहे. मात्र, विराटच्या तुलनेत रोहितने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये केवळ निम्मेच सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत तुलना करणे कठीण आहे. परंतु तरीही दोघांनी किमान 20 डाव खेळले आहेत. त्यामुळे तुलना करता येईल. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने 42 डाव खेळले आहेत. तर रोहित शर्माने केवळ 20 डाव खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये या दोन्ही फलंदाजांना एकही द्विशतक झळकावता आलेले नाही. विराट कोहलीच्या धावांची संख्या 1979 आहे. तर रोहित शर्माने आतापर्यंत केवळ 650 धावा केल्या आहेत.
विराट कोहलीची बीजीटीमध्ये सरासरी 48.26 आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेत रोहितची सरासरी 34.21 आहे. स्ट्राइक रेटबद्दल बोलायचे झाल्यास, विराट कोहलीने 52.25 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत, तर सलामीवीर रोहित शर्माचा स्ट्राइक रेट त्याच्यापेक्षा थोडा कमी आहे. रोहितचा स्ट्राईक रेट 51.14 आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने 8 शतके झळकावली आहेत. तर रोहित शर्माला फक्त एकदाच शतक झळकावता आले आहे. विराटने बीजीटीच्या इतिहासात 5 अर्धशतके झळकावली आहेत आणि रोहित शर्माने 3 वेळा अशी कामगिरी केली आहे.
हेही वाचा-
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी मोहम्मद शमीचे पुनरागमन, या सामन्यातून करणार कमबॅक!
“सीएसके माझ्यासाठी बोली…”, मेगा लिलावापूर्वी चेन्नईच्या स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य
IPL 2025; जोस बटलर-मिचेल स्टार्क नाही, हा परदेशी खेळाडू मेगा लिलावात खळबळ माजवणार!