विशाखापट्टणम कसोटीचा पहिला दिवस यशस्वी जयस्वाल याच्या नावावर राहिला. इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियममध्ये खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाखेर जयस्वाल त्याच्या पहिल्या द्विशतकाजवळ पोहोचला आहे. तर भारतीय संघान 93 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 336 धावांपर्यंत मजल मारली आहे.
भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनी डावाची सुरुवात केली. रोहित 41 चेंडूत 14 धावा करून शोएब बशीरच्या चेंडूवर बाद जाला. त्यानंतर आलेला शुबमन गिल यानेही 46 चेंडूत 34 धावा केल्यानंतर विकेट गमावली. जेम्स अँडरसनने यष्टीरक्षक बेन फोक्सच्या हातात गिलला झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि जयस्वाल यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी झाली. पुढे गिल यानेही संघाची धावसंख्या 179 असताना वैयक्तिक 34 धावा करून विकेट गमावली.
यशस्वी जयस्वाल याने तोपर्यंत आपले शतक पूर्ण केले होते. 151 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. दिवसाखेर जयस्वालची धावसंख्या 257 चेंडूत 179* धावा केल्या. यात 17 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी गिल आणि रविचंद्रन अश्विन भारताचा डाव सुरू करतील. अश्विनने पहिल्या दिवसाखेर 10 चेंडूत 5* धावा केल्या आहेत.
Stumps on Day 1 of the 2nd Test.
Yashasvi Jaiswal batting beautifully on 179*
Scorecard – https://t.co/X85JZGt0EV #INDvENG @IDFCFIRSTBank pic.twitter.com/XlRqDI8Sgt
— BCCI (@BCCI) February 2, 2024
भारतासाठी रजत पाटीदार याने या सामन्यातून कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात पाटीदारला लय सापडली, असे वाटले होते. पण 72 चेंडूत 32 धावा केल्यानंतर त्याने विकेट गमावली. अक्षर पटेल याने 51 चेंडूत 27 धावा केल्या. केएस भरत याने 23 चेंडूत 17 धावा केल्यानंतर विकेट गमावली.
इंग्लंडसाठी या सामन्यात फिरकीपटू रेहान अहमद आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या आहेत. दिवसाचा खेळ संपण्याआधी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि फिरकीपटू टॉम हार्टली यांनाही प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
ENG vs IND । रोहित पुन्हा ठरला फुसका बॉम्ब! ‘या’ कारणास्तव धावा करण नाहीये कर्णधार
IND vs ENG । मैदानात पाय टाकताच अँडरसनच्या नावावर मोठा विक्रम, 29 वर्षांनंतर घडला ‘हा’ पराक्रम