भारतीय पुरूष क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2022च्या (T20 World Cup) आधी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका प्रथम खेळली जाणार असून चाहते याच्यासाठी आतूर आहेत. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना पंजाबच्या मोहालीतील बिंद्रा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सांयकाळी 7.00 वाजता सुरूवात होणार आहे. तर या सामन्यासाठी वातावरण आणि खेळपट्टी कशी असणार हे आपण जाणून घेऊया.
पहिल्या सामन्यावेळी कसे असेल हवामान
वेदर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, सप्टेंबर 20 या दिवशी सकाळी आणि दुपारी तापमान 32° सेल्सियस असणार आहे. तर दिवसा आणि रात्री आभाळ स्वच्छ असणार आहे. पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी आहे. तसेच दिवसा आर्द्रता कमी असणार असून रात्री ते वाढण्याची शक्यता आहे.
पहिल्या सामन्यावेळी कशी असेल खेळपट्टी
आयएस बिंद्रा स्टेडियमची खेळपट्टी ही मोठी धावसंख्या नोंदवणारी आहे. येथे आंतरराष्ट्रीय टी20च्या पहिल्या डावाची सरासरी 177 असून दुसऱ्या डावाची सरासरी 170 आहे. असे असले तरी या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळते. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीवर चांगली मदत मिळू शकते. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीची काही षटके ही वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे या सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाज लवकर विकेट्स मिळवू शकतात.
या स्टेडियममध्ये आतापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत. यातील तीन सामने भारताने खेळले असून हे तिन्ही सामने भारतानेच जिंकले आहे. हे तिन्ही सामने भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकले आहे.
ऑस्ट्रेलियानेही 2016मध्ये पाकिस्तान विरुद्ध एक टी20 सामना खेळला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी जिंकला होता. या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या भारताने केली होती. त्यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना 4 विकेट्स गमावत 211 धावा केल्या होत्या.
मोहालीच्या स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांनी ज्या संघांविरुद्ध टी20 सामने खेळले ते सगळे सामने दोन्ही संघांनी जिंकले आहेत. यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात कोण ठरेल विजेता हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संघ-
ऍरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, टीम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, ऍश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, सीन ऍबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, ऍडम झंमा, नॅथन इलिस.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट यादीत पहिला क्रमांक गाठणार? सचिनच्या 100 शतकांविषयी रिकी पॉंटिंगचे मोठे वक्तव्य
न्यूझीलंडने टी20 वर्ल्डकपसाठी जाहीर केला संघ, केंद्रीय करार धुडकावून लावणाऱ्या खेळाडूंचाही समावेश
मैदानावरील वाईट कामगिरीमुळे टीकाकारांचा निशाणा ठरलेला ‘हा’ भारतीय ओपनर, आता स्पष्टीकरण देत म्हणाला…