भारतीय संघाचे युवा खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर छाप पाडत आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीतही नवोदित खेळाडू शानदार कामगिरी करत आहेत. ज्यात नितीश, यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर यांनी चमकदार केली आहे. शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कठीण परिस्थितीत नितीशकुमार रेड्डीने शानदार अर्धशतक झळकावले आणि भारताकडून फॉलोऑनचा धोका टळला. याच दरम्यान एका फोटे व्हायरल होत आहे. ज्यात दिसत आहे की अंपायरने डोक्यावर स्प्रे मारत आहे. तर या बातमीद्वारे जाणून घेऊयात, तो कोणता स्प्रे आहे? तर त्याचे उपयोग काय?
बाॅक्सिंग डे कसोटीच्या या मेलबर्न मैदानावर ढगाळ वातावरण झाल्याने माश्या घोंगावत आहेत, आणि नेमकं त्या डोक्यावर घोंगतात त्यामुळे फलंदाजांना खेळताना प्रॅाब्लेम होत आहे. त्यामुळे नितीशकुमार रेड्डी आणि अंपायरने या स्प्रेचा वापर केला आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाच्या 474 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात चहापानापर्यंत 326 धावा जोडल्या आङेत. तर संघाने 7 विकेट्सही गमावल्या आहे. ज्यामध्ये नितीशकुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी 100+ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे. परिणामी भारत पहिल्या डावात 326 धावांवर पोहचला आहे. मात्र संघ आणखी 148 धावांनी पिछाडीवर आहे.
भारताने पहिल्या डावातील 92 व्या षटकात 300 धावांचा टप्पा गाठला. पहिल्या डावात भारताची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर म्हणून आल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (3) फलंदाजी केली नाही. यशस्वी जयस्वालने (82) उत्कृष्ट खेळी केली. मात्र तो धावबाद झाला. याशिवाय विराट कोहलीने 86 चेंडूत 35 धावा केल्या. तर रिषभ पंतने 28 आणि केएल राहुलने 24 धावांचे योगदान दिले.
हेही वाचा-
नितीशकुमार रेड्डीचे ‘पुष्पा’ सेलीब्रेशन, अर्धशतक ठोकताच दाखवला ‘फायर’ अंदाज, पाहा VIDEO
IND vs AUS: ‘मूर्खपणाची हद्द…’, रिषभ पंतच्या शाॅट सिलेक्शनवर सुनील गावस्कर संतापले
असं झालं तर… रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करणार? ही बीजीटी मालिका शेवटची ठरणार!