रोहित शर्मा याचे वनडे विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न रविवारी (19 नोव्हेंबर) पूर्ण होणार, असे अनेकांना वाटत होते. पण वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून विजय मिळवला आणि रोहितचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. पराभवानंतर कर्णधार रोहित भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील ही लढत चढाओढीची राहिली. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना 240 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 43 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा याने फलंदाजाच्या रुपात 47 धावांची खेळी केली होती. त्याच्याकडून चाहत्यांना शतकाची अपेक्षा अशतानाच त्याने ट्रेविस हेड याच्या हातात त्याने झेल दिला. ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर त्याची विकेट झाली.
कर्णधार म्हणून आणि वैयक्तिक प्रदर्शनाच्या बाबत रोहितने या विश्वचषकात संघासाठी अप्रतिम कामगिरी केली. एकही पराभव न स्वीकारता भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. पण अंतिम सामन्यात कर्णधाराचे स्वप्न पूर्ण झाले नाही. ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी केली आणि इतिहासातील सहावा वनडे विश्वचषक जिंकला. पराभवानंतर कर्णधार रोहितच्या डाळ्यातील पाणी सर्वांना पाहायला मिळाले. रोहितचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Very Sad Day for every Indian..Nothing is more painful than watching tears in the eyesbof our Captain ????????#RohithSharma #ViratKohli #INDvsAUS #Worlds2023 Karma #Panauti #CWC23Final #NewJeans pic.twitter.com/QdFz0jeA91
— Ankit Khanna (@ankit_khanna) November 19, 2023
Our team and our captain surely deserved a better ending. ????#RohithSharma #INDvsAUSfinal #INDvAUS #Worlds2023 pic.twitter.com/0tJAIne2uv
— Ritesh sahu (@riteshsahu6993) November 19, 2023
दरम्यान, अंतिम सामन्यातील सर्वोत्तम प्रदर्शनाचा विचार केला, तर ट्रेविस हेड सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. हेडने पहिल्या तीन विकेट्स स्वस्तात गेल्यानंतर खेळपट्टीवर विकेट टिकवून ठेकवी. 120 चेंडूत 137 धावांची सर्वोत्तम खेळी करून त्याने मोहम्मद सिराजच्या चेंडूवर विकेट गमावली. तसेच मार्नल लॅबुशेन (58) याच्यासोबत मोठी भागीदारीही केली. लॅबुशेन आणि हेड यांची भागीदारी वेळेत रोखता न आल्यामुळे भारताला या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. (IND vs AUS World Cup Final Rohit Sharma holding back his tears)
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया – ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड (World Cup 2023 IND vs AUS final Toss See playing XI Here)
महत्वाच्या बातम्या –
फक्त निराशा! विकेट्स मिळत नसल्यामुळे बुमराहचा संयम सुटला, लाईव्ह सामन्यातील चुकिचे कृत्य कॅमेऱ्यात कैद
Top 5 फलंदाज, ज्यांनी World Cup 2023मध्ये केल्या सर्वाधिक धावा; विराट-रोहितने गाजवली यादी