सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ सुरू असून १८ वा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्टेलियाने भारतावर ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा सलग ५ वा विजय आहे, तर भारताचा हा तिसरा पराभव होता. या सामन्यात अनेक विक्रम पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून मिताली राजने ६८ धावा केल्या, तर हरमनप्रीत कौरने ५७ धावा आणि यास्तिका भाटियाने ५९ धावा केल्या. भारतीय संघाने ५० षटकांत ७ विकेट्स गमावत २७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य ४९.३ षटकांत ४ विकेट्स गमावत पूर्ण केले आणि हा सामना ६ वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने ६ विकेट्सने जिंकला.
ऑस्ट्रेलियाकडून खेळताना कर्णधार मेग लॅनिंगने शतक गमावत १३ चौकारांच्या मदतीने १०७ चेंडूत ९७ धावा केल्या. तिला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. तसेच हेलीने ७२, तर मूनीने ३० धावा केल्या. संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात ८ धावा हव्या होत्या, तेव्हा मूनीने दोन चौकार लगावत भारताला विजय मिळवून दिला होता.
भारताविरुद्धच्या विजयासह ऑस्ट्रेलिया महिला संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय मिळवत इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया सलग १७ सामने जिंकणारा पहिला संघ बनला आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय पुरुषांचे २००५ ते २००६च्या मध्ये सलग १७ सामने जिंकण्याच्या विक्रमाची बराबरी केली आहे.
अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीने शनिवारी (१९ मार्च) महिला क्रिकेट इतिहासातील २००वा सामना खेळणारी दुसरी महिला खेळाडू बनली आहे. भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने आतापर्यंत सर्वाधिक २३० सामने खेळले आहेत. झूलन गोस्वामीने या सामन्यादरम्यान एलिट क्लबमध्ये समाविष्ट झाली आहे.
मिताली राज सर्वाधिक विश्वचषक सामन्यात ५०हून अधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. मितालीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९६ चेंडूत ६८ धावा करत हे यश मिळवले आहे. मितालीने १२ वेळा ५०हून अधिक धावा केल्या आहेत. तिने अशी कामगिरी करत न्यूझीलंड संघाची माजी खेळाडू डेबी हाॅकलेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
सर्वाधिक सामन्यात ५०हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडू
या यादीत प्रथम क्रमांकावर इंग्लंडची शार्लेट एडवर्ड्स आहे. तिने ११ वेळा ५०हून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची करेन रोल्टनने ९ वेळा ५०हून अधिक धावा केल्या आहेत आणि न्यूझीलंडच्या सूजी बेट्सने ८ वेळा ५०हून अधिक धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहली, गंभीरमधील २०१३च्या विवादावर व्यक्त झाला केकेआरचा माजी कर्णधार, दिलीय अशी प्रतिक्रिया
आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज, एकाने तर तब्बल ३ वेळा केलाय पराक्रम