भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया चांगलीच मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. भारतीय संघाने सामन्याच्या पहिल्या डावात केवळ 150 धावा केल्या असतील आणि सर्वबाद झाला असेल. परंतु या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. दरम्यान, टीम इंडियाचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकावले आहे. हे शतक त्याच्यासाठी आणि भारतासाठी ऐतिहासिक ठरले. तब्बल 47 वर्षांनंतर भारतीय फलंदाजाने ऑस्ट्रेलियात असे खास शतक ठोकले आहे.
भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 205 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. जयस्वालचा ऑस्ट्रेलियातील हा पहिलाच कसोटी सामना आहे. याआधी भारतासाठी ऑस्ट्रेलियातील पहिल्याच कसोटी सामन्यात केवळ दोनच फलंदाजांनी शतक झळकावले होते. अशी कामगिरी करणारा जयस्वाल हा भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियात शतक ठोकणे हे सर्वात कठीण काम आहे. मात्र जयस्वालने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात ते करुन दाखवले आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात त्याने आपल्या शानदार फलंदाजीने स्वत:ला सिद्ध केले.
HUNDRED FOR YASHASVI JAISWAL 🇮🇳
– First Australian tour, against Cummins, Starc, Hazelwood, Lyon, team under huge pressure and 22 year old Jaiswal has smashed an incredible Hundred, one to remember forever in his career. pic.twitter.com/O7ZY4zoaWD
— Johns. (@CricCrazyJohns) November 24, 2024
यशस्वी जयस्वालच्या सुनील गावस्करांनी 1977 मध्ये ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत 47 वर्षांनंतर भारतीय फलंदाजाने आपल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. हा पराक्रम पहिल्यांदा 1968 मध्ये मोटागनहल्ली जयसिम्हा यांनी केला होता. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यातही त्याने ही कामगिरी केली होती. 2014 साली टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन मुरली विजयला अशी कामगिरी करण्याची संधी मिळाली होती. पण ॲडलेड टेस्टमध्ये मुरली विजय 99 धावा करून बाद झाला होता.
हेही वाचा-
IPL 2025 Mega auction; सर्वात आधी या खेळाडूंवर लागणार बोली, या ठिकाणी पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग
रिषभ पंतने ‘अनोखे शतक’ झळकावून इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक
IND vs AUS; बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीसाठी रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना