---Advertisement---

IND vs AUS: ॲडलेड कसोटीत टीम इंडियाची अवस्था वाईट, पहिल्या सत्रात कांगारुंचा वरचढ

---Advertisement---

यंदाच्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूने खेळवली जात आहे. या सामन्यात भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही आणि पहिल्याच सत्रात संघाला अनेक मोठे धक्के बसले. मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी शानदार गोलंदाजी केली आणि तो आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. लंच ब्रेकपूर्वी भारतीय संघाने 23 षटकांत 4 गडी गमावून 82 धावा केल्या. तर सध्या रोहित शर्मा (1*) आणि रिषभ पंत (4*) क्रीजवर आहेत.

तत्तपूर्वी नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच चेंडूवर तो चुकीचा ठरला. कारण गेल्या सामन्यात शानदार फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जयस्वालला खातेही उघडता आले नाही. मिचेल स्टार्कने त्याला बाद केले. यानंतर केएल राहुलही झगडताना दिसला. पण नशिबाने त्याला साथ दिली. त्याला स्कॉट बोलँडच्या एका षटकात दोन जीवदान मिळाले. जयस्वाल बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिलने अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले. त्यांनी 69 धावांची भागिदारी केली.

खराब सुरुवातीनंतर भारताचा हंगाम चांगला संपेल असे वाटत होते. पण एकापाठोपाठ तीन मोठे विकेट पडल्या. केएल राहुल पहिला आऊट झाला. त्याने 64 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही. त्याने 8 चेंडूत 7 धावा केल्या. दुखापतीमुळे पर्थमध्ये न खेळलेला शुबमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. पण त्याला मोठी खेळी करता आले नाही. स्कॉट बोलंडने त्याला परत तंबूत पाठवले. गिलने 51 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 31 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन बळी घेतले आहेत. स्कॉट बोलँडनेही एक विकेट मिळवला.

क्रीजवर उपस्थित असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि रिषभ पंत या जोडीवर दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला सावरण्याची जबाबदारी असेल. या दोघांमध्ये मोठी भागीदारी झाली नाही, तर भारतीय संघाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा-

IND VS AUS; ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी का बांधली? कारण भावूक करणारं
स्टार्कशी पंगा नको रे बाबा! पर्थ कसोटीत स्लेज करणारा जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद
IND vs AUS; गुलाबी चेंडू टीम इंडियासाठी डोकेदुखी, पाहा आतापर्यंतचा रेकॉर्ड!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---