बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये खेळवली जात आहे. ही पिंक बॉल टेस्ट आहे. जी आज 06 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. लाल चेंडूने खेळणाऱ्या टीम इंडियासाठी ॲडलेडमध्ये एक वेगळा अनुभव असणार आहे. याआधी पहिल्यांदा टीम इंडियाने 2020 मध्ये पिंक बॉल टेस्ट परदेशी भूमीवर खेळली होती.
टीम इंडियाने शेवटची पिंक बॉल टेस्ट परदेशी भूमीवर ॲडलेडमध्येच खेळली. आता पुन्हा एकदा टीम इंडिया पिंक बॉल टेस्टसाठी ॲडलेड ओव्हलवर दाखल झाली आहे. 2020 मध्ये मात्र भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. चला तर मग जाणून घेऊया पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड कसा राहिला आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत गुलाबी चेंडूच्या चार कसोटी खेळल्या आहेत. चारपैकी भारताने तीन सामने जिंकले आहेत. पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाचा एकमेव पराभव 2020 मध्ये ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या गुलाबी चेंडू कसोटीत टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणे रंजक ठरेल.
पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाने बांग्लादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आपली सर्वोच्च धावसंख्या केली. कोलकाता येथे बांग्लादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटीत भारताने 347/9 धावा केल्या होत्या. तर टीम इंडियाने पिंक बॉल टेस्टमध्ये सर्वात कमी 36 धावा केल्या होत्य. जे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये बनले होते.
विराट कोहलीने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटीत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. कोहलीने आतापर्यंत 46.16 च्या सरासरीने 277 धावा केल्या आहेत. त्यानंतर रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने आत्तापर्यंत गुलाबी चेंडूच्या तीन कसोटी खेळल्या आहेत. ज्यात त्याने 43.25 च्या सरासरीने 173 धावा केल्या आहेत. पुढे तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर दिसत आहे. अय्यरने 1 गुलाबी चेंडूची कसोटी खेळली. ज्यात त्याने 79.50 च्या सरासरीने 159 धावा केल्या.
हेही वाचा-
6 डिसेंबरला जन्मलेल्या खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, जसप्रीत बुमराहसह अनेक दिग्गजांचा समावेश
IND VS AUS; टीम इंडियाचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय, या तीन बदलांसह भारतीय संघ मैदानात
ख्रिस गेल किंवा मॅक्सवेल नाही तर या फलंदाजाच्या नावावर सर्वात लांब षटकाराची नोंद






