भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (4 डिसेंबर) कॅनबेरा येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ कठीण परिस्थितीत होता. मात्र अष्टपैलू रवींद्र जडेजाने अखेरच्या षटकांत केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठता आली. परंतु सामन्यादरम्यान जडेजाच्या डोक्याला चेंडू लागला त्यामुळे अस्वस्थ वाटत असल्यामुळे दुसऱ्या डावात तो मैदानात येऊ शकला नाही.
भारताचा डाव संपल्यानंतर जडेजाने कन्कशनसंबंधी तक्रार केली. त्याला चक्कर येण्यासारखे वाटत असल्याने, भारतीय संघ व्यवस्थापनाने सामनाधिकारी डेविड बून यांना कल्पना देऊन कन्कशन सब्टीट्यूटची मागणी केली, ज्याला सामनाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. जडेजाचा बदली खेळाडू म्हणून फिरकीपटू युझवेंद्र चहल मैदानात उतरला.
ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना जडेजाच्या जागी फिरकीपटू युझवेंद्र चहलला संधी देण्याचा निर्णय योग्य वाटला नाही. त्यामुळे पहिल्या डावानंतर मिळालेल्या विश्रांतीदरम्यान सामना रेफेरी डेविड बून यांच्याशी लँगर वाद घालताना दिसले.
#INDvsAUS #concussion
Jaddu's concussion comes as blessing in disguise for India. Chahal will bowl. Aussie coach Langer shows his obvious angst. pic.twitter.com/xOWT3tb5AN— Parveen K Dogra (@kparveen) December 4, 2020
Strange to see Australian coach Justin Langer, arguing with officials during AusvsIndT20 whether bowler @yuzi_chahal can be a concussion substitute for @imjadeja who took fierceful hit on helmet.
In 2019,Oz had replaced Steve Smith against Eng
Concussion subst can bat/bowl pic.twitter.com/42bm2kk1kn
— Rohan Dua (@rohanduaT02) December 4, 2020
I hate it when my non biological dads fight. #AUSvsIND pic.twitter.com/b0jNUBrEat
— Adam Zwar (@adamzwar) December 4, 2020
मात्र, युझवेंद्र चहलने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि 4 षटकांत 25 धावा देऊन 3 गडी बाद केले.यात ऍरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ या महत्वाच्या फलंदाजांचा समावेश होता. उत्कृष्ट गोलंदाजीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलची रचना बदलण्याचा बीसीसीआयचा मानस; दोन नवीन संघांसह आकर्षक बदलांचा समावेश
‘त्याला’ गोलंदाजी करताना पाहिले आणि तेच करण्याचा प्रयत्न केला, युझवेंद्र चहलचा खुलासा
दुसऱ्या टी२० सामन्यात अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन, ‘हा’ खेळाडू ठरू शकतो ‘ट्रम्प कार्ड’
ट्रेंडिंग लेख –
…म्हणून पुण्यात २० वर्षांपूर्वी झालेला ‘तो’ सामना सचिन तेंडुलकरसाठी ठरला खास
‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?
पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी