---Advertisement---

बांगलादेशला पराभूत केल्यानंतर कॅप्टन कोहली म्हणाला…

---Advertisement---

भारत विरुद्ध बांगलादेश संघातील पहिल्या कसोटी सामन्यात आज भारताने तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडीही घेतली आहे.

हा सामना भारताने 3 दिवसांत आपल्या नावावर केला. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने खेळाडूंच्या जबरदस्त कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.

या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी 14 गडी बाद केले. याबद्दल कोहली म्हणाला, ‘वेगवान गोलंदाजांनी उच्च स्तराची कामगिरी केली. जेव्हा ते गोलंदाजी करत होते तेव्हा वेगळ्या प्रकारची खेळपट्टी दिसत होती.’

‘सध्या बुमराह या कसोटीचा भाग नाही. पण तो जेव्हा परत येईल तेव्हा आमची गोलंदाजी अधिक आक्रमण आणि मजबूत होईल. कोणत्याही कर्णधारासाठी हे स्वप्न गोलंदाजीचे संयोजन आहे. स्लिप क्षेत्ररक्षकदेखील सज्ज आहेत कारण त्यांना माहित आहे की चेंडू कोणत्याही षटकात त्यांच्याकडे येऊ शकतो. गोलंदाजी मजबूत असणे महत्वाची गोष्ट आहे.’

चांगल्या कामगिरीबरोबरच भारतीय संघाने अनेक विक्रम नोंदवत आहे. यावर कोहली म्हणाला,  आमचे लक्ष भारतीय क्रिकेटला उच्च स्थानावर घेऊन जाण्याकडे आहे. आम्हाला आकडेवारीची काळजी नाही.

याबरोबरच 22 नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणाऱ्या दिवस- रात्र कसोटी सामन्याबद्दल विराट म्हणाला, ‘गुलाबी चेंडू लाल चेंडूपेक्षा खूप चांगली सुरुवात करुन देतो. गुलाबी चेंडूचा हा कसोटी सामना रोमांचक असणार आहे. भारतीय कसोटी क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.

त्याचबरोबर प्रेक्षकांबद्दल विराट म्हणाला, ‘सामन्याच्या मागील तीन दिवसांत बरीच गर्दी होत होती. यामुळे खेळाडूंना चांगली कामगिरी करण्याची अधिक प्रेरणा मिळते.’

तसेच विराटने मयंक अगरवालच्या द्विशतकी खेळीचेही कौतुक केले आहे. तो म्हणाला, ‘मला मोठी धावसंख्या करण्याचे महत्त्व माहित आहे, मला बराच वेळ लागला. त्यामुळे त्याने मोठ्या धावा कराव्यात अशी माझी इच्छा होती. त्यामुळे एक वरिष्ठ फलंदाज म्हणून माझी इच्छा आहे की त्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे. मी केलेल्या चूका त्यांनी परत करु नयेत, असे मला वाटते.’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---