---Advertisement---

शतकवीर अश्विनने सांगितले त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे रहस्य; म्हणाला, “4-5 वर्षांपूर्वी…”

On: शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024 10:13 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध बांगलादेश संघात चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आतापर्यंत भारतीय अष्टपैलू रविचंद्रन अश्विनचा जलवा पाहायला मिळाला आहे. अश्विनने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे. शतकानंतर अश्विनने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे रहस्य सांगितले आहे.

38 वर्षीय अश्विनने आपल्या परिपक्व फलंदाजीने हे सिद्ध केले की तो दबावाची परिस्थिती हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहे. आणि आता त्याने सामन्यादरम्यान कोणतीही प्रतिक्रिया देणे बंद केले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसानंतर अश्विन म्हणाला, ‘मी दडपणाचाही आनंद लुटला आहे. दवाबामुळे तुम्हाला शक्य तितके प्रयत्न करण्याची आणि प्रतिसाद देण्याची संधी देते. मात्र, पूर्वी अशा परिस्थितीत मी स्वतःची आणि इतरांची टीका करायचो. मी स्वतःवर खूप दबाव आणायचो.’

अश्विनच्या मते, ‘मी नेहमी धैर्याने दबावाचा सामना केला. याला मी माझ्या प्रात्यक्षिकातून किंवा पत्रकार परिषदेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता मात्र मी खूप बदललो आहे. मला चेहऱ्यावर हसू घेऊन क्रिकेट खेळायचे आहे. मी चार-पाच वर्षांपूर्वी स्वत:ला वचन दिले होते की मी कोणावरही प्रतिक्रिया देणार नाही आणि आता मी त्याचे पालन करत आहे.’

चेन्नईच्या या खेळाडूने असेही सांगितले की, त्याने गेल्या तीन वर्षांत त्याच्या फलंदाजीवर खूप लक्ष दिले, जेणेकरुन संघात त्याला अधिक योगदान देता येईल. तो म्हणाला, ‘मी यावर (फलंदाजी) खूप काम केले आहे. मी माझ्या फटक्यांमध्ये खूप सुधारणा केली आहे, ज्या प्रकारे मी वेगवान गोलंदाजांचा सामना करतो. त्याचे परिणाम मिळत आहेत याचा मला आनंद आहे. यातून मला खूप समाधान मिळत आहे.’

दरम्यान अश्विनने 133 चेंडूत 113 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने 2 षटकार आणि 11 चौकार मारले. यानंतर गोलंदाजीत मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs BAN: एकाच दिवशी पडल्या 17 विकेट्स, 1979 नंतर चेपॉकवर पहिल्यांदाच असं घडलं
IND vs BAN: 17 धावांवर बाद होऊनही कोहलीने रचला इतिहास!

‘चुकीच्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली’, बांगलादेशविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या रोहितला चाहत्यांचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---