भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) दोन्ही संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगला आहे. त्यातील दुसरा दिवस संपला. भारताने पहिल्या डावात 376 धावा करत बांगलादेशला गार केले. पाहुण्या संघाचा पहिला डाव केवळ 149 धावांवरच आटोपला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 3 गडी गमावून 81 धावा केल्या होत्या, त्यामुळे संघाची एकूण आघाडी 308 धावांपर्यंत पोहोचली. तत्पूर्वी कोहली 17 धावा करून बाद झाला असला तरी त्याने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे.
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) घरच्या मैदानावर 12,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. चेन्नईतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशविरुद्ध फलंदाजी करताना त्याने हा टप्पा गाठला. ही कामगिरी करणारा कोहली दुसरा खेळाडू आहे. त्याआधी महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाच (Sachin Tendulkar) ही कामगिरी करता आली आहे. घरच्या मैदानावर खेळताना तेंडुलकरने 14,000 हून अधिक धावा केल्या आहेत.
कोहलीने 12,000 हून अधिक धावा 58.84च्या सरासरीने केल्या आहेत. त्यामध्ये त्याने 38 शतके आणि 59 अर्धशतके झळकावली आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) घरच्या मैदानावर खेळताना 258 सामन्यांत 50.32च्या सरासरीने 14,192 धावा केल्यानंतर निवृत्ती घेतली. त्याने घरच्या मैदानावर 42 शतके आणि 70 अर्धशतके झळकावली आहेत.
घरच्या मैदानावर खेळताना भारतीय खेळाडू- सचिन तेंडुलकर 14,192 धावा, विराट कोहली 12,004 धावा, राहुल द्रविड 9,004 धावा, रोहित शर्मा 8,690 धावा, वीरेंद्र सेहवाग 7,691 धावा
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहली नॉट आऊट होता, तरीही रिव्ह्यू घेतला नाही; कर्णधार-अंपायर सगळेच हैराण
IND vs BAN: बांगलादेशविरूद्धच्या दोन्ही डावात कर्णधार रोहित शर्मा फ्लाॅप!
चेन्नई कसोटीवर भारताची मजबूत पकड, दुसऱ्या दिवसाचा खेळ टीम इंडियाच्या नावे