चेन्नई येथे भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारी (19 सप्टेंबर) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय संघ अडचणीत सापडल्यानंतर आधी यशस्वी जयस्वाल व रिषभ पंत यांनी डाव सावरला. त्यानंतर रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन यांनी 199 धावांची भागीदारी केल्यानंतर भारतीय संघ 376 पर्यंत मजल मारू शकला. या सामन्याच्या दोन्ही डावात भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा सपशेल अपयशी ठरला. त्यानंतर आता त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
भारतीय संघासाठी रोहितने दोन्ही सामन्यात सलामी दिली. मात्र, हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात छाप पाडण्यात तो अपयशी ठरला. रोहित पहिला डावात हसन महमूद याच्या चेंडूवर केवळ सहा धावा करून माघारी परतला. तर दुसऱ्या डावात आक्रमक खेळण्याची इच्छा घेऊन उतरलेल्या रोहितला फक्त पाच धावांवर समाधान मानावे लागले. तो तस्किन अहमदचा बळी ठरला.
Rohit Sharma dismissed for 5 in 7 balls. pic.twitter.com/5Kq7nmeAkX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 20, 2024
रोहितच्या या अपयशानंतर सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जातेय. त्याला एका चाहत्याने म्हटले, ‘रोहितने चुकून वेगळ्याच प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्याने कसोटीतून निवृत्त व्हायला पाहिजे होते.’ अन्य एका चाहत्याने लिहिले, ‘हसन मेहमूद रोहितला सांगू इच्छितो की, आता त्याने कसोटीतूनही निवृत्त व्हावे.’
रोहितने जून महिन्यात झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती घेतली होती. त्याच्यासोबत विराट कोहली यांनी देखील क्रिकेटच्या या छोट्या प्रकाराला रामराम ठोकलेला. सध्या सुरू असलेल्या या मालिकेतील दोन्ही डावात ते अपयशी ठरले आहेत. रोहित प्रमाणेच विराटला देखील या सामन्यात विशीचा आकडा घातला नाही. विराट पहिला डावात 6 तर दुसऱ्या डावात केवळ 17 धावा करून बाद झाला. त्यांच्याकडे आता कानपूर कसोटीत मोठी खेळी करण्याची संधी असेल.
हेही वाचा –
IND vs BAN: बांगलादेशविरूद्धच्या दोन्ही डावात कर्णधार रोहित शर्मा फ्लाॅप!
चेन्नई कसोटीवर भारताची मजबूत पकड, दुसऱ्या दिवसाचा खेळ टीम इंडियाच्या नावे
आकाश दीपच्या वेगानं बांगलादेशी फलंदाज हादरले, प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलची प्रतिक्रिया व्हायरल