भारत विरूद्ध बांगलादेश (IND vs BAN) संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानावर रंगला आहे. त्यातील दुसरा दिवस संपला. या सामन्यात भारताने आपली पकड मजबूत केली आहे. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दोन्ही डावात फलंदाजी करताना निराश झाला. पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही रोहितची बॅट शांत राहिली आणि तो केवळ 5 धावा करून तंबूत परतला.
भारतीय संघाने बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांत आटोपला. बांगलादेशचा डाव संपल्यानंतर दुसऱ्या डावात रोहित शर्मा (Rohit Sharma) फलंदाजीत चमकदार कामगिरी करेल याची चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, रोहित पुन्हा एकदा बांगलादेशी गोलंदाजांच्या हाती सापडला. वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदने (Taskin Ahmad) रोहितला केवळ 5 धावांवर पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
पहिल्या डावात रोहित केवळ 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. चेन्नईमध्ये सुरू असणाऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात त्याने एकूण 11 धावा केल्या आहेत. रोहितने जगातील मोठ्या संघांविरुद्ध फलंदाजी करताना आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. मात्र, त्याच्या बॅटने आजपर्यंत बांगलादेशविरुद्ध फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. रोहितने त्याच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध एकूण 4 सामने खेळले आहेत. दरम्यान 5 डावात केवळ 44 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी आतापर्यंत एकूण 59 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने 101 डावात फलंदाजी करताना 45.46च्या सरासरीने 4,137 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 17 अर्धशतके आणि 12 शतके झळकावली आहेत, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 धावा राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई कसोटीवर भारताची मजबूत पकड, दुसऱ्या दिवसाचा खेळ टीम इंडियाच्या नावे
यशस्वी जयस्वालच्या नावावर विश्वविक्रम! दिग्गजांना टाकले मागे
आकाश दीपच्या वेगानं बांगलादेशी फलंदाज हादरले, प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलची प्रतिक्रिया व्हायरल