भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीपनं बांगलादेशच्या पहिल्या डावात धारदार गोलंदाजी करत सलग दोन चेंडूंवर दोन फलंदाजांना बोल्ड केलं. त्याची ही उत्कृष्ट गोलंदाजी पाहून टीम इंडियाचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल फार आनंदी दिसले. त्यांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं. विशेष म्हणजे, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील आकाश दीपच्या गोलंदाजीनं प्रभावित झाले.
आकाश दीपनं झाकीर हसन (3) आणि मोमिनुल हक (0) यांचे लागोपाठ बळी घेतले. त्यानं आधी हसनला बोल्ड केलं. यानंतर पुढच्याच चेंडूवर मोमिनुल हकचा त्रिफळा उडवला. या दोघांनाही त्याच्या चेंडूचा अंदाज लावता आला नाही. या दोन सलग विकेट्समुळे बांगलादेशचा संघ बॅकफूटवर आला.
आकाश दीपनं या सामन्यात 5 ओव्हर गोलंदाजी केली. त्यानं 19 धावा देत 2 बळी घेतले. या 27 वर्षीय वेगवान गोलंदाजाचा हा दुसराच कसोटी सामना आहे. त्यानं यावर्षी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
What a sight for a fast bowler!
Akash Deep rattles stumps twice, giving #TeamIndia a great start into the second innings.
Watch the two wickets here 👇👇#INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/TR8VznWlKU
— BCCI (@BCCI) September 20, 2024
Morne Morkel As Indian Coach
Vs
Morne Morkel As Pakistani Coach#JaspritBumrah #TravisHead #SanjuSamson #RavindraJadeja #RavichandranAshwin #Ashwin #RAshwin #ViratKohli𓃵 Siraj. #RohitSharma𓃵 #AkashDeep #INDvsBANTEST #AaqibKhan #GautamGambhir… pic.twitter.com/TC8cro6st9— Addy Boss 🇮🇳 (@addy__boss) September 20, 2024
भारताच्या 376 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 149 धावांवर ऑलआऊट झाला. संघ 50 षटकही फलंदाजी करू शकला नाही. अनुभवी शाकिब अल हससनं एककी झुंज देत सर्वाधिक 32 धावा केल्या. बाकी एकही फलंदाज 30 धावांचा आकडा गाठू शकला नाही. लिटन दासनं 22, कर्णधार नजमल हुसैन शांतोनं 20 आणि मेहंदी हसन मिराजनं नाबाद 27 धावांंचं योगदान दिलं.
भारताकडून जसप्रीत बुमराहनं घातक गोलंदाजी केली. त्यानं 11 षटकांत 50 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी 2-2 विकेट घेतल्या. या सामन्यात बुमराहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो 10वा भारतीय गोलंदाज आहे.
हेही वाचा –
टीम इंडियानं वाजवला बांगलादेशचा बँड, दोन सेशन्समध्ये संपूर्ण टीम ऑलआऊट
भारतीय कर्णधाराने मागितली सिराजची माफी, कारण काय?
जसप्रीत बुमराहचा आणखी एक विक्रम; झहीर खान, कपिल देव, मोहम्मद शमीच्या खास क्लबमध्ये एंट्री