---Advertisement---

U19 Asia Cup; सेमीफायनल सामन्यात वैभव सूर्यवंशीची दमदार खेळी, भारताची फायनलमध्ये धडक

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2024 6:42 PM
---Advertisement---

भारताने अंडर 19 आशिया कपच्या (U19 Asia Cup 2024) फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे. दुबईत रविवारी (8 डिसेंबर) रोजी भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संंघात सामना रंगणार आहे. भारतीय संघाने सेमीफायनलध्ये श्रीलंकेचा 7 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात भारताकडून वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) दमदार कामगिरी केली.

अंडर-19 आशिया कप 2024च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 173 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने अवघ्या 21.4 षटकांत सामना जिंकला. यादरम्यान वैभव सूर्यवंशीने 36 चेंडूत 67 धावा केल्या. दरम्यान त्याने 6 चौकारांसह 5 षटकार ठोकले. आता भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे.

आता भारतीय संघ रविवारी बांगलादेशविरूद्ध फायनल सामना खेळणार आहे. बांगलादेशने स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात चमकदार कामगिरी केली. दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 116 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 22.1 षटकांत शानदार विजय मिळवला.

वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने अंडर 19 आशिया कप 2024च्या 4 सामन्यात 167 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 12 चौकारांसह 12 षटकार ठोकले. त्याने 2 अर्धशतकेही झळकावली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियातही लोड शेडिंगची समस्या! ॲडलेड मैदानावरची वीज वारंवार खंडीत
भारताला विकेटच मिळेना, ॲडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
बुमराहची कपिल-झहीरच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री! यावर्षी अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---