---Advertisement---

‘आता बॅट मारतो का मला…’, इशानकडून विराटच्या वक्तव्याचा खुलासा

On: मंगळवार, डिसेंबर 13, 2022 7:49 PM
Virat-Kohli-And-Ishan-Kishan
---Advertisement---

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात इशान किशन याने द्विशतक केल्यानंतर तो माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. इशान भारतीय संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. या सामन्यातील त्याच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर भारताने 227 धावांनी मोठा विजय मिळवला. इशान किशनच्या साधीने विराट कोहली देखील स्वतःचे शतक पूर्ण करू शकला. या वादळी खेळीनंतर इशानने एक रोमांचक प्रसंगाचा खुलासा केला आहे. खेळपट्टीवर असताना त्याने विराटला आधीच एक गोष्ट सांगून ठेवली होती, ज्यामुळे तो ही मोठी खेळी पूर्ण करू शकला. 

इशान किशन (Ishan Kishan) या सामन्यात 131 चेंडू खेळला आणि यामध्ये 210 धावा केल्या. तर दुसरीकडे विराट कोहलीने 113 धावांची खेळी केली. द्विशतकीय खेळीनंतर इशान किशनने सांगितले की, त्याने स्वतः विराटला सांगून ठेवले होते की, “मला मोठे शॉट्स खेळण्यापासून थांबव.” इशान किशन म्हणाला, “मी जेव्हा 197 धावांवर होतो, तेव्हा मला वाटले मुस्तफिजूर एक संथ गतीचा चेंडू टाकेल, पण मला एका सामन्यात संधी मिळाली होती, जी मी गमावू इच्छित नव्हतो. त्यामुळेच मी विराट भाईला बोलून ठेवले होते की, प्लीज मला सांगत राहा की एक धाव घ्यायची आहे, एक धाव घ्यायची आहे. असे केले नाही, तर गाठ माझ्याशी आहे.”

“विराट कोहली मला आठवण करून देत होता की, सिंगल घ्यायचा आहे. मग आनंदात मी पाहिले देखील नाही की, कोण कुठं उभ आहे. विराट भाई माझ्या मागे होता, तेव्हा तो असेही म्हणाला की, मार मला मार…” इशानची बॅट विराटला लागणार होती, त्यामुळे विराट असे म्हटला. दरम्यान, इशान किशनचे या सामन्यातील प्रदर्शन अप्रतिम होतो. त्याने हे द्विशतक अवघ्या 126 चेंडूत पूर्ण केल्यामुळे सर्वात वेगवान द्विशतकाचा मान देखील त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याने या खेळीदरम्यान 24 चौकार आणि 10 षटकार ठोकले.

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युवराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गंभीरने असे काय लिहिले, ज्यावर भलतेच भडकलेत नेटकरी
IPL 2023: ‘मिनी ऑक्शन’साठी अंतिम यादी तयार! इतक्या खेळाडूंवर लागणार बोली; इंग्लंडचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---