भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघांत तीन सामन्यांची एकदिवसीय, तर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने अवघ्या एका विकेटने जिंकला आणि आघाडी देखील घेतली. मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (7 डिसेंबर) मिरपूरमध्ये शेर ए बांगला स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होता, पण तीन षटके टाकल्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले.
नुकत्याच पार पडलेल्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात नियमित कर्णदार रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्रांतीवर होता. पण बांगलादेश दौऱ्यात मात्र रोहितने संघात पुनरागमन केले. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही, परिणामी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यात देखील रोहित संघाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला, जास्त काळ मैदानात थांबता आले नाही. बांगलादेशच्या फलंदाजीवेळी रोहितला दुसऱ्या षटकात दुखापतग्रस्त झाला आणि त्याला मैदाना सोडावे लागले. रोहितनंतर भारताला वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) याच्या रूपात दुसरा मोठा झटका बसला.
दीपक चाहर या सामन्यात अवघी तीन षटके गोलंदाजी करू शकला. चाहरकडून चाहत्यांना चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती. मात्र, दुखापतीमुळे तो स्वतःचा 10 षटकांचा कोटा पूर्ण करू शकला नाही. माध्यमांतील वृत्तानुसार दीपक चाहर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अर्ध्यातून सामन्यातून बाहेर पडला. त्याने टाकलेल्या तीन षटकांमध्ये 12 धावा खर्च केल्या, पण एकही विकेट घेऊ शकला नाही. चाहरचे एकंदरीत प्रदर्शन पाहिले तर, त्या मागच्या वर्षभरता दुखापतीमुळे काही महत्वाच्या मालिका खेळू शकला नाहीये. यामध्ये आशिया चषक 2022, टी-20 विश्वचषक 2022 आणि आयपीएल 2022 अशा मालिकांचा समावेश आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे चाहरच्या आणि एकंदरीत भारतीय संघाच्या चाहत्यांची चिंता मात्र वाढली आहे.
उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसानावर 271 धावा केल्या. यामध्ये मागच्या सामन्यात त्यांचा मॅछ विरन खेळाडू मेहदी हसन याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. हसनने बुधवारी 100 धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. संघाने केलेल्या 271 धावांमध्ये मोहमुदुल्लाह यानेही 77 धावांचे योगदान दिले. भारतासाठी वॉशिंगटन सुंदर सर्वाधिक तीन विकेट्स घेऊ शकला. (IND vs BAN Deepak Chahar out of the field due to hamstring)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराजकडून बांगलादेशी फलंदाजाची स्लेजिंग, व्हिडीओ होताय व्हायरल
मेहदी हसनच्या शतकामुळे बांगलादेशने उभारला 271 धावांचा डोंगर, भारत करणार का पार?