भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या दिवशी बांग्लादेशच्या युवा गोलंदाजासमोर टीम इंडियाचे टाॅप ऑर्डर फलंदाज झगडताना पाहायला मिळाले. हसन महमूदच्या आग ओकणाऱ्या चेंडूंवर रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात तंबूत परतले. तर सामन्यानंतर या गोलंदाजानी सांगितले , जर त्यांच्या गोलंदाजांनी पट्टा घट्ट केला तर बांग्लादेश भारताला 400 पेक्षा कमी धावसंख्येत बाद करू शकेल.
हसनच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे भारताने 34 धावांवर रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्या विकेट्स गमावल्या. संघाने 144 धावांवर 6 फलंदाज गमावले होते. मात्र यानंतर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील 195 धावांच्या भागीदारीने भारताला सामन्यात पुनरागमन केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 6 गडी गमावून 339 धावा आहे. अश्विन 102 धावा करून क्रीजवर उपस्थित आहे तर जडेजाने 86 धावा केल्या आहेत.
पहिल्या दिवसाच्या खेळानंतर हसन महमूदने पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला, “मला वाटते की जर आम्ही त्यांना 400 च्या आधी ऑलआऊट केलो तर ते आमच्यासाठी चांगले होईल. आता विकेटवर फलंदाजी करणे खूप सोपे आहे. परिस्थिती फलंदाजांसाठी अनुकूल आहे. भारतावर दबाव कसा आणता येईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आशा आहे की आम्ही ते करू शकू.”
महमूदने कबूल केले की बांग्लादेशच्या गोलंदाजांची लाईन लेंथ खराब झाली. म्हणून विशेषत: अंतिम सत्रात संघाने खुप धावा दिल्या. पण त्याच्या संघात पुनरागमन करण्याची ताकद आहे आणि दुसऱ्या दिवशी लवकर विकेट घेतल्यास भारतावर पुन्हा दडपण येईल. असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
महमूद म्हणाला, “आम्ही आमच्या गोलंदाजीत थोडे अधिक शिस्तबद्ध राहू शकलो असतो. आम्ही योग्य दिशेने गोलंदाजी करण्याचा आणि विरोधी संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहोत. लय भारताकडे आहे. परंतु आम्ही प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना 400 च्या आत रोखू शकतो.”
हेही वाचा-
IND VS BAN; बांग्लादेशकडून नियमांचे उल्लंघन, आयसीसीकडून मोठी कारवाईची शक्यता
10 चौकार, 3 षटकार… दुलीप ट्रॉफीत संजू सॅमसनचा रुद्रावतार; केली इतक्या धावांची खेळी
“तू खूप मोठा प्लेयर आहेस पण..”, अश्विनचं कौतुक करताना सूर्यकुमारची गोंधळात टाकणारी पोस्ट