जगभरात क्रिकेट खेळणाऱ्या अनेक संघांमध्ये असे काही खेळाडू असतात, जे नेहमीच स्वत:च्या विक्रमांपेक्षा संघासाठी विजय मिळवण्याचा विचार करतात. या खेळाडूंमध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याच्या नावाचाही समावेश आहे. विराटला ‘टीम मॅन’ म्हणून ओळखले जाते. तो नेहमीच वैयक्तिक विक्रमांपेक्षा जास्त महत्त्व संघाच्या विजयाला देतो. हे त्याने अनेकदा सिद्धही केले आहे. मात्र, आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत गुरुवारी (दि. 19 ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. विराट यादरम्यान चक्क आपले शतक पूर्ण करण्यासाठी खूपच उत्सुक झाल्याचे दिसत होता.
विराट कोहली (Virat Kohli) याचे शतक (Century) पूर्ण करण्यात सर्वाधिक योगदान केएल राहुल (KL Rahul) याचे राहिले. कारण, त्यानेच विराटला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवले. अशातच आता विराट कोहली आणि केएल राहुल (Virat Kohli And KL Rahul) यांच्यात सामन्यादरम्यान काय चर्चा झाली होती, हे समोर आले आहे. स्वत: राहुलने याचा खुलासा केला आहे.
शतकासाठी काय झाली चर्चा
बांगलादेशविरुद्धच्या शानदार विजयानंतर राहुलने मैदानात विराटशी झालेल्या चर्चेचा खुलासा केला. तो म्हणाला की, त्याने विराटला एक-एक धाव घेण्यापासून विरोध केला. तो म्हणाला, “मी सिंगल घेण्यासाठी विराटला नकार दिला, तेव्हा विराट मला म्हणाला की, ‘जर आपण एक धाव घेतली नाही, तर लोक विचार करतील की, मी वैयक्तिक विक्रमासाठी खेळत आहे.’ मात्र, मी विराटला म्हणालो की, आपण सहजरीत्या जिंकत आहोत, तेव्हा तू तुझे शतक पूर्ण कर.”
KL Rahul said, "I denied single to Virat Kohli, he said it would be bad if you won't take singles, people will think I'm playing for personal milestone. But I said we are comfortably winning, you complete your century". pic.twitter.com/U1av1ID6x7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2023
विराटचे विश्वचषकात पाठलाग करताना पहिले शतक
विराट कोहली याने वनडे विश्वचषकाच्या इतिहासात धावांच्या पाठलाग करताना केलेले हे पहिलेच शतक आहे. बांगलादेशविरुद्ध विराट जबरदस्त लयीत दिसला. त्याने यावेळी 97 चेंडू खेळताना नाबाद 103 धावांची शतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 4 षटकार आणि 6 चौकारही होते. विशेष म्हणजे, विराट सचिन तेंडुलकर याच्या वनडेतील 49 शतकांच्या अगदी जवळ पोहोचला आहे. विराटची वनडेतील 48 शतके पूर्ण झाली आहेत. त्याला सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी एक, आणि विक्रम मोडण्यासाठी दोन शतकांची गरज आहे. (ind vs ban icc world cup 2023 kl rahul reveals talks with virat kohli for completing hundred against bangladesh read here)
हेही वाचा-
CWC 2023: भारताच्या विजयानंतर Point Tableमध्ये मोठा उलटफेर, ‘या’ संघांच्या बदलल्या जागा; टाका नजर
विराटचा पुण्यातील अनोखा कारनामा वर्षोनुवर्षे राहील आठवणीत, दिग्गजाने फक्त 1 बॉलवर चोपल्या ‘एवढ्या’ धावा