भारतीय संघ बांगलादेशसोबत आगामी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरूवात (19 सप्टेंबर) पासून होणार आहे. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. त्यामध्ये केएल राहुलची देखील निवड झाली आहे. तत्पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे की, केएल राहुलला (KL Rahul) भारतीय संघात स्थान का देण्यात आले?
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “तुम्हाला सर्वांना माहित आहे की, केएल राहुलमध्ये काय गुणवत्ता आहे. त्याने सर्व सामने खेळावेत, असा स्पष्ट संदेश आम्ही त्याला दिला आहे. आम्हाला त्याची सर्वोत्तम कामगिरी हवी आहे. त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे ही आपली जबाबदारी आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले आणि हैदराबादमधील पहिल्या कसोटीत 80च्या वर धावा केल्या. यानंतर तो दुखापतीमुळे खेळू शकला नसला तरी तो लय कायम राखेल अशी अपेक्षा आहे.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला, “केएल राहुल फिरकी आणि वेगवान गोलंदाजी दोन्ही उत्तम प्रकारे खेळतो. कसोटी क्रिकेटमध्ये तो चमकदार कामगिरी करेल यात शंका नाही. त्याला आता संधी आहे.”
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना (19 सप्टेंबर) रोजी चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये खेळला जाणार आहे.
बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
महत्त्वाच्या बातम्या-
भारताने 5व्यांदा कोरले चॅम्पियन्स ट्राॅफीवर नाव, फायनलमध्ये चीनला पछाडले
भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके, जेव्हा इतर कोणत्याही फलंदाजाने केले नाही अर्धशतक
Women’s T20 World Cup : चॅम्पियन संघांना मिळणार छप्परफाड पैसा, टी20 विश्वचषकाच्या बक्षिस रक्कमेत लक्षणीय वाढ