भारतीय संघात एकापेक्षा एक खेळाडू आहेत. प्रत्येकामध्ये वेगळी क्षमता आहे. कुणी फलंदाजीत चमकतोय, कुणी गोलंदाजीने फलंदाजांच्या दांड्या गुल करतोय, तर कुणी यष्टीरक्षणाने फलंदाजाला तंबूत धाडतोय. असाच एक प्रतिभावान यष्टीरक्षक फलंदाज म्हणजे रिषभ पंत होय. बांगलादेश विरुद्ध भारत संघात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी रिषभ पंतने स्टंपिंग (यष्टीचीत) करत एमएस धोनी याची आठवण करून दिली. त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
झाले असे की, सामन्याच्या चौथ्या दिवशी रिषभ पंत (Rishabh Pant) याने बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज नुरुल हसन याला यष्टीचीत करत तंबूत धाडले. पंतने ज्या वेगात फलंदाजाला यष्टीचीत केले, ते पाहण्यासारखे होते. त्याला पाहून असे वाटले की, जणू त्याने विजेच्या वेगाने फलंदाजाला यष्टीचीत केले आहे. त्याच्या या यष्टीरक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडिवार वाऱ्यासारखा व्हायरल होत आहेत.
अवघ्या 3 धावांवर फलंदाज तंबूत
पंतच्या या यष्टीरक्षणानंतर मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे इशारा केला. तिसऱ्या पंचांनी जेव्हा रिप्लेमध्ये पाहिले, तेव्हा दिसले की, नुरुल हसन याचा पाय जवळपास रेषेच्या वर होता आणि त्याचा पाय जमिनीवर येण्यापूर्वीच पंतने यष्टीमागून त्याच्या दांड्या उडवल्या होत्या. जर त्याचा पाय जमिनीवर आला असता, तर तो कदाचित बाद झाला नसता. मात्र, पंतने असे होऊच दिले नाही. नुरुल या डावात 3 धावांवरच तंबूत परतला. तो त्याच्या डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर पंतच्या यष्टीरक्षणाचा शिकार बनला. ही घटना अक्षर पटेल टाकत असलेल्या 88व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली.
𝐋𝐢𝐠𝐡𝐭𝐧𝐢𝐧𝐠 𝐅𝐚𝐬𝐭 𝐒𝐭𝐮𝐦𝐩𝐢𝐧𝐠 from @RishabhPant17 ⚡🤩
We are sure we all have seen this somewhere before 🫶
Can you let us know where? 💬🧤#BANvIND #SonySportsNetwork pic.twitter.com/hTJ1dMkrpa— Sony Sports Network (@SonySportsNetwk) December 17, 2022
करून दिली एमएस धोनीची आठवण
रिषभ पंत याने त्याच्या शानदार यष्टीरक्षणाने भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) याची आठवण करून दिली. धोनी त्याच्या वेगवान यष्टीरक्षणासाठी ओळखला जात होता. तो अनेकदा अशाप्रकारचे यष्टीरक्षण करताना दिसायचा. धोनीने अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या वेगवान यष्टीरक्षणाने तंबूत जाण्यासाठी भाग पाडले आहे. कोणताही फलंदाज जर क्रीझच्या पुढे गेला, तर धोनी त्याला परतण्याची संधीच देत नसायचा. आता पंतही धोनीच्या मार्गावर चालताना दिसत आहे. यापूर्वी विराटच्या हातातून सुटलेला शानदार झेलही घेतला होता. त्यामुळेही त्याचे चांगलेच कौतुक झाले होते. (ind vs ban rishabh pant did a very fast stumping against bangladesh in test match watch video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंचांच्या ‘या’ निर्णयामुळे विराट आणि कुलदीप नाराज, गोलंदाजाने रागाच्या भरात मारली लाथ
‘आयपीएल त्याच्यासाठी बनली नाहीये, तो…’ दिनेश कार्तिकने कुणाबद्दल केले भाष्य?