टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने काल (12 ऑक्टोबर शनिवारी) रोजी हैदराबादच्या मैदानावर बांग्लादेशविरुद्ध फलंदाजीत खळबळ माजवली. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो भारताचा दुसरा फलंदाज ठरला. संजू सॅमसनने अवघ्या 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मात्र या सामन्यापूर्वी त्याच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या की हा त्याच्या टी20 कारकिर्दीतील शेवटचा सामना देखील असू शकतो. संजू सॅमसनलाही हे माहीत होते. कारण त्याने स्वत: कबूल केले होते की, जेव्हा तो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दोनदा शून्यावर आऊट झाला होता. तेव्हा त्यालाही वाटले होते की, कदाचित त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळणार नाही.
संजू सॅमसन बांग्लादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यानंतर म्हणाला, “श्रीलंकेत दोनदा शून्यावर आऊट झाल्यानंतर मला संधी मिळेल की नाही याबद्दल मला शंका होती. मानसिकदृष्ट्या तुम्ही एक व्यक्ती म्हणून भारतीय क्रिकेटर बनता. गोष्टी, विशेषत: या फॉरमॅटमध्ये, जिथे एक फलंदाज म्हणून यशापेक्षा अधिक अपयश येतात. त्यामुळे तुम्हाला आक्रमक राहावे लागते आणि स्कोअर करण्याच्या पर्यायांवर लक्ष केंद्रित करावे लागते”. मालिकेतील पहिल्या सामन्यात सॅमसनने 29 धावांची आणि दुसऱ्या सामन्यात 10 धावांची खेळी खेळली होती.
शतकवीर सॅमसनने आत्मविश्वास दाखवून साथ दिल्याचे श्रेय संघ व्यवस्थापनाला दिले. तो म्हणाला, “कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी मला प्रत्येक प्रकारे साथ दिली. पुढच्या मालिकेतही त्यांनी मला पाठिंबा दिला आणि सांगितले की आम्ही काहीही असो, तुम्हाला पाठिंबा देत राहू. मला वाटते की एक फलंदाजी गट म्हणून आम्ही प्रत्येक संघावर मात करू शकू. विरोधी संघावर वर्चस्व राखण्यासाठी वचनबद्ध आहे.
सॅमसनने असेही सांगितले की, त्याला तीन आठवड्यांपूर्वी सांगण्यात आले होते की तो या मालिकेत सलामी करेल. सॅमसन म्हणाला, “मालिकेच्या तीन आठवड्यांपूर्वी, मला नेतृत्व गटाकडून संदेश मिळाला की मी सलामी करणार आहे. यामुळे मला योग्य तयारीसाठी वेळ मिळाला. मी पुन्हा आरआर (राजस्थान राॅयल्स) अकादमीमध्ये गेलो आणि नवीन चेंडूंविरुद्ध खूप (सराव) खेळलो. त्यामुळे मदत झाली.”
हेही वाचा-
टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये केला नवा विश्वविक्रम, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यादीतही नाही
कर्णधारपद गेलं, आता टीममधूनही होणार बाबर आझमची हकालपट्टी! पीसीबी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ind vs nz; कसोटी मालिकेसाठी किंग कोहली बेंगळुरूला रवाना; बालेकिल्ल्यात 3 दिवसांनी सामना