टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानं एक प्रथा सुरू केली होती. या प्रथेला विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांसारख्या कर्णधारांनी पुढे नेलं. ही प्रथा आहे, कोणतीही मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी संघातील युवा खेळाडूंच्या हाती सोपवणे. आता या प्रथेला भारताचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवनं पुढे नेलं आहे.
बांगलादेश विरुद्धची टी20 मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवनं ट्रॉफी मालिकेत पदार्पण करणाऱ्या मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या हाती सोपवली. यानंतर संपूर्ण संघानं जल्लोष केला. भारतीय संघाच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफार व्हायरल होत आहे. चाहते याला खूप पसंती देत आहेत. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
View this post on Instagram
वेगाचा बादशाह मानल्या जाणाऱ्या मयंक यादवचं पदार्पण खूप चांगलं राहिलं. त्यानं मालिकेत 4 विकट घेतल्या. शेवटच्या सामन्यात त्यानं पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन कमाल केली. तो टी20 आंतरराष्ट्रीय मध्ये सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा केवळ चौथा भारतीय बनला. त्याच्यापूर्वी भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी ही कामगिरी केली आहे.
नितीश रेड्डीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं पदार्पणाच्या मालिकेत 90 धावा केल्या. दुसऱ्या टी20 मध्ये त्यानं 34 चेंडूत 4 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकारांच्या मदतीनं 74 धावांची तुफानी खेळी केली. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. याशिवाय त्यानं मालिकेत 3 विकेट देखील घेतल्या.
भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या टी20 सामन्याबद्दल बोलायचं झालं, टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या तुफानी शतकाच्या जोरावर 20 षटकांत 297 धावा ठोकल्या. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 164 धावाच करू शकला. अशाप्रकारे भारतानं हा सामना 133 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला.
हेही वाचा –
भारताचे वर्ल्ड कप विजेते प्रशिक्षक मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, संघानं दिली मोठी जबाबदारी
या गोलंदाजासमोर बुमराह-शमी देखील फेल, बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी
ind vs ban; टीम इंडियाने टी20 मलिका गाजवली; पाकिस्तानचा हा विक्रम मोडीत