गोंगडी त्रिशाच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने बांग्लादेशचा पराभव करत अंडर-19 महिला आशिया कप स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. क्वालालंपूरच्या बियामास ओव्हलमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावून 117 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ केवळ 76 धावांवर सर्व बाद झाला आणि भारताने हा सामना 41 धावांनी जिंकला. गोंगडी त्रिशाला तिच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियासाठी गोंगडी त्रिशा ही एकमेव फलंदाज होती, जिने 20 धावांचा टप्पा ओलांडली. तिने 47 चेंडूत 5 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 52 धावांची शानदार खेळी केली. संघाचे पाच फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. तिच्या या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाला मर्यादित 20 षटकात सन्मानजनक धावांपर्यंत मजल मारता आली. तर बांग्लादेशकडून फरझाना इस्मीनने सर्वाधिक 4 बळी घेतले.
118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला बांगलादेशचा संघ सुरुवातीपासूनच हतबल होताना दिसत होता. संघाच्या फलंदाजीच्या कामगिरीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की झुरिया फिरदौसने सर्वाधिक 22 धावा केल्या आणि तिच्याशिवाय फक्त फहमिदा चोया (18) हिने दुहेरी आकडा गाठला. इतर फलंदाजांनकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. बांग्लादेश संघाचे 9 फलंदाज केवळ एक अंकी धावा करू शकले.
भारतासाठी ही स्पर्धा खूपच अप्रतिम होती. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. तर नेपाळविरुद्धचा सामना पावसामुळे अर्निर्णीत राहिला. यानंतर सुपर-4 मध्ये भारताने बांग्लादेश आणि श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले.
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦 🏆
India Women U19 are the inaugural winners of the #ACCWomensU19AsiaCup 👏
Scoreboard ▶️ https://t.co/uREtAlBiiq#TeamIndia | #ACC | #Final pic.twitter.com/D1R6z6nENY
— BCCI Women (@BCCIWomen) December 22, 2024
हेही वाचा-
Year Ender 2024: जेव्हा घरच्या मैदानावर भारताचा कसोटीत मोठा पराभव झाला, किवी संघाने रचलेला इतिहास
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबई अपयशी, प्रतिस्पर्धी संघाने 383 धावांचे आव्हान गाठले
IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का, सरावसत्रात केएल राहुल दुखापती