---Advertisement---

IND vs BAN: दुसऱ्या टी20 साठी टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल; अश्या पद्धतीने झाले स्वागत

On: मंगळवार, ऑक्टोबर 8, 2024 1:37 PM
---Advertisement---

बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ दिल्लीत पोहोचला आहे. मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये खेळला गेला होता. जो जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुसऱ्या टी20 साठी सज्ज दिसत आहे. टीम इंडिया ग्वाल्हेरहून दिल्लीला पोहोचल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

टीम इंडिया दिल्लीला पोहोचल्याचा व्हिडिओ खूपच रंजक आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पहिली टीम इंडिया ग्वाल्हेरहून निघते आणि दिल्लीला रवाना होते. यावेळी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलसह संघातील अनेक खेळाडू दिसत आहेत. त्यानंतर भारतीय खेळाडू दिल्ली विमानतळावर उतरतात.

यानंतर वादक हॉटेलमध्ये पोहोचतात तेथे ढोल-ताशांच्या गजरात खेळाडूंचे स्वागत केले जाते. दरम्यान, कॅप्टन सूर्यकुमार यादव ढोलाच्या तालावर नाचताना पाहायला मिळत आहे. सूर्याचा डान्स खरोखरच रंजक होता.

 

ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतीय संघाने सहज विजय मिळवला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 19.5 षटकात 127 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने केवळ 11.5 षटकांत 132/3 धावा करून विजय मिळवला. यादरम्यान, हार्दिक पांड्याने संघासाठी शानदार खेळी खेळली आणि 16 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 39* धावा केल्या. संघासाठी विजयी षटकार हार्दिकच्या बॅटमधून आला.

आता भारत आणि बांग्लादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना बुधवार, 09 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. त्यानंतर टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.

हेही वाचा-

रणजी ट्राॅफी; मुंबईला धक्का; पहिल्या सामन्यापूर्वी स्टार फलंदाज संघाबाहेर
ऐकावं ते नवलचं! आंतरराष्ट्रीय सामन्यात चक्क फलंदाजी प्रशिक्षकाने केली फिल्डिंग; पाहा VIDEO
मयंक यादव vs उमरान मलिक; स्पीड, वय, ताकद-कमकुवतता; पाहा कोण भारी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---