भारतीय क्रिकेट संघ 19 सप्टेंबरपासून बांगलादेश विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसह भारतीय क्रिकेट हंगामाची सुरुवात होईल. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारताचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याच्यावर सर्वांची नजर असेल. विराट कशी कामगिरी करतो, यावर भारतीय संघाचे यश देखील अवलंबून असणार आहे. या मालिकेत विराट याच्याकडे चार विक्रम बनवण्याची संधी असणार आहे.
भारतीय संघ मोठ्या कालावधीनंतर बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. विराट नेहमीच बांगलादेशविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करतो. त्यामुळे या दोन सामन्यात त्याच्याकडे चार नवे विक्रम रचण्याची नामी संधी चालून आली आहे.
1. कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावा
विराटने या मालिकेत 152 धावा बनवल्या तर, तो कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावा पूर्ण करेल. विराटचा फॉर्म पाहता तो हा विक्रम सहज पार करण्याची शक्यता आहे. तसेच तो इंग्लंडचे माजी कर्णधार ग्रॅहम गूच यांचा 8900 धावांचा विक्रम देखील मोडेल.
2. चेतेश्वर पुजाराला पछाडण्याची संधी
विराट कोहली याने या मालिकेत 32 धावा केल्या तर चेतेश्वर पुजाराचा बांगलादेश विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट आपल्या नावे करेल. पुजारा याने बांगलादेश विरुद्ध आत्तापर्यंत 468 धावा केल्या आहेत. तर विराटच्या नावे 437 धावा आहेत. पुजारा मागील एक वर्षापासून भारतीय संघातून बाहेर आहे.
3. बांगलादेश विरुद्ध झळकावू शकतो पहिले अर्धशतक
विराट याने आत्तापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 30 अर्धशतके पूर्ण केली आहेत. मात्र, बांगलादेशविरुद्ध तो एकही अर्धशतक झळकावू शकला नाही. त्याने त्यांच्याविरुद्ध शतके मात्र केली आहेत.
4. डॉन ब्रॅडमन यांच्या पुढे जाण्याची शक्यता
विराटच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये 29 शतके आहेत. या मालिकेत आणखी दोन शतके केल्यास तो सर डॉन ब्रॅडमन यांचा 30 शतकांचा विक्रम मोडीत काढेल. यासोबतच मॅथ्यू हेडन व शिवनारायण चंद्रपॉल यांना देखील तो पछाडेल.
हेही वाचा –
इंग्लंडमध्ये रहाणेचे खणखणीत शतक, बांगलादेश मालिकेपूर्वी ठोठावलं टीम इंडियाचं दार!
दोन वर्षांनंतर कसोटी शतक! बांगलादेशच्या या फलंदाजानं पाकिस्तानला धो-धो धुतलं
‘हिटमॅन’च्या निशाण्यावर वीरेंद्र सेहवागचा जबरदस्त रेकॉर्ड… बांगलादेश मालिकेत रचणार इतिहास!