भारत आणि बांग्लादेश यांच्यात कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. आज दुसऱ्या कसोटी सामन्याचा पाचवा दिवस सुरू आहे. सामना संपण्यापूर्वी भारताने पहिल्या डावातच अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. टीम इंडियाने असा विक्रम केला आहे. जो 21 व्या शतकात इतर कोणत्याही संघाला करता आला नाही. सर्वात कमी षटकांमध्ये कसोटी डाव घोषित करण्याचा विक्रम आहे.
कानपूर येथे खेळल्या जात असलेल्या बांगdलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात अप्रतिम आक्रमकता दाखवली. पावसामुळे जवळपास दोन दिवसांचा खेळ गमावल्यानंतर भारताने चौथ्या दिवशी बांग्लादेशला पहिल्या डावात 233 धावांत गुंडाळले. वेळेची कमतरता लक्षात घेऊन कर्णधार रोहित शर्माने आक्रमक रणनीती अवलंबण्याचा निर्णय घेतला. संघाने हे खूप चांगल्यारितीने केले. बांग्लादेशच्या गोलंदाजांवर खेळाडू तुटून पडले, जे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.
भारताने पहिल्या डावात केवळ 34.4 षटकात 285 धावा केल्या. यानंतर कर्णधाराने खेळाला एक दिवसापेक्षा जास्त वेळ शिल्लक असतानाही 52 धावांची आघाडी घेऊन डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. 21 व्या शतकातील ही पहिलीच वेळ होती की एखाद्या संघाने 35 षटकांपेक्षा कमी षटकात पहिला डाव घोषित केला होता आणि गेल्या 70 वर्षात असे घडण्याची दुसरी वेळ होती.
भारताने पहिल्या डावात सर्वात वेगवान 50, 100, 150 आणि 200 धावांचा विक्रम मोडला. यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी डावाला चांगली सुरुवात करून दिली. त्यामुळे भारताने अवघ्या 3 षटकात 50 धावा पूर्ण केल्या आणि कसोटी इतिहासातील सर्वात जलद 50 धावांचा विक्रम केला. यानंतर भारताने 10.1 षटकात 100 धावा पूर्ण केल्या आणि कसोटीत सर्वात जलद 100 धावांचा विक्रम केला. भारताने कसोटीत 18.2 षटकात सर्वात जलद 150 धावा करण्याचा विक्रमही केला. 24.2 षटकात 200 धावा पूर्ण करून वेगवान 200 धावांचा विक्रम केला. 30.1 षटकात 250 धावा पूर्ण करत भारताने कसोटीत सर्वात जलद 250 धावा करण्याचा विक्रमही केला.
हेही वाचा-
दुसऱ्या डावात बांग्लादेश ढेपाळला, भारत ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर
13 वर्षीय खेळाडूने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज
“ज्याने 9000 धावा केल्या…”, सुनील गावस्कर भारतीय संघाच्या रणनीतीवर संतापले