---Advertisement---

13 वर्षीय खेळाडूने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज

---Advertisement---

अवघ्या 13 वर्षांच्या भारतीय पठ्याने इतिहास रचला आहे. त्याने ही कामगिरीकरुन भारताचा 19 वर्षाखालील संघाचा सर्वात तरुण फलंदाज बनला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (अंडर-19) यांच्यात खेळल्या जात असलेल्या युवा कसोटी सामन्यात सूर्यवंशीने अर्धशतक झळकावताच, तो आपल्या नावावर एक विशेष विक्रम करण्यात यशस्वी झाला. जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही स्तरावर आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावणारा सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. सध्या वैभव सूर्यवंशीचे वय 13 वर्षे 187 दिवस आहे. याआधी हा विक्रम बांग्लादेशच्या नजमुल शांतोच्या नावावर होता. नजमुल शांतोने 2013 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्यावेळी नजमुल शांतोचे वय 14 वर्षे 231 दिवस होते.

कोणत्याही स्तरावर आंतरराष्ट्रीय पन्नास धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू

13 वर्षे 187 दिवस – वैभव सूर्यवंशी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, आज (2024)
14 वर्षे 231 दिवस – नझमुल शांतो विरुद्ध श्रीलंका, 2013
14 वर्षे 272 दिवस – हसन रझा VS इंग्लंड, 1996

 

चेन्नईच्या चेपॉक येथे खेळल्या जात असलेल्या युवा कसोटी सामन्यात सूर्यवंशीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 47 चेंडूत 81 धावा केल्या होत्या. ज्यात 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय 19 वर्षाखालील संघाने 14 षटकांत 103/0 अशी धावसंख्या केली आहे.

रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये बिहारसाठी पदार्पण करून वैभव सूर्यवंशी खूप चर्चेत आला. त्याने मुंबईविरुद्ध पदार्पण केले. यावेळी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेनेही वैभवचे खूप कौतुक केले होते. यानंतर तो छत्तीसगडविरुद्ध रणजी सामनाही खेळला. मात्र, दोन्ही डावात त्याला खातेही उघडता आले नाही. वैभवने आतापर्यंत खेळलेल्या 2 रणजी सामन्यात 31 धावा केल्या होत्या.

वैभव सूर्यवंशी 2024 च्या सुरुवातीला रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. या डावखुऱ्या फलंदाजाने सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांचे विक्रम मोडीत काढले होते. वैभव अवघ्या 12 वर्षांचा होता जेव्हा त्याने मुंबईविरुद्ध बिहारकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करून इतिहास रचला.

हेही वाचा-

“ज्याने 9000 धावा केल्या…”, सुनील गावस्कर भारतीय संघाच्या रणनीतीवर संतापले
अभिषेकसोबत रिंकू सिंग ओपनिंग करणार! टी20 साठी माजी क्रिकेटपटूचा मास्टर प्लॅन
रहाणेपासून- ऋतुराजपर्यंत इराणी कपमध्ये दिसणार अनेक स्टार्स, या ठिकाणी पाहा लाईव्ह सामना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---