भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. प्रथम पहिल्या दिवशी पावसामुळे सामन्याल उशीरा सुरुवात झाली. सततच्या पावसामुळे आखेर पहिल्या दिवसाचा खेळ 35 षटकांत रद्द करावा लागला. दरम्यान आज म्हणजेच 28 सप्टेंबर सामन्याचा दुसरा दिवस देखील एकही चेंडू न-टाकता रद्द करण्यात आला आहे. दरम्यान माजी कसोटी क्रिकेटपटू आणि समालोचक आरपी सिंगने जर पावसामुळे खेळ रद्द होतो तर ड्रेसिंग रूममध्ये काय परिस्थिती असती, याचा खुलासा केला आहे.
कानपूर येथील ग्रीन पार्क येथे भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने संपूर्ण खेळ खराब केला आहे. पहिल्या दिवशी केवळ 35 षटकेच खेळता आली. त्यानंतर रात्रभर पाऊस पडत राहिला. आज दुसऱ्या दिवशी खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत राहिले. पण सामन्याला सुरुवात झाली. दुसरा दिवसाचा खेळ देखील रद्द करण्यात आला.
अश्या स्थिती जेव्हा पावसामुळे खेळ थांबतो, तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये काय परिस्थिती असती याचा खुलासा आरपी सिंगने केला आहे. तो म्हणाला, ” खेळाडू देखील चाहत्याप्रमाणे पाऊस थांबण्याची वाट पाहत असतात. तर काही जण या वेळेचा उपयोग करतात. त्यांच्यासाठी अनेक असाइनमेंट आहेत. त्यापध्दतीने ते त्याच्या टिक-बॉक्सवर टिक करतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याला कार्डिओ करायचा असेल तर तो त्यावेळी पूर्ण करतो. पण बरेच खेळाडू टेबल टेनिस वगैरे खेळून मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती राखतात.”
पुढे बोलताना तो म्हणाला, हवामान खात्यानुसार, कानपूरमध्ये चार दिवस पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत हा सामना कसा पूर्ण होणार याबाबत प्रश्न कायम आहेत. पण क्रिकेटपटूंना कमांडोप्रमाणे सामना खेळण्यासाठी सज्ज राहावे लागते आणि त्यासाठी ते विविध उपाययोजना करत राहतात.
दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेल्यास तिसऱ्या दिवशीचा खेळ होण्याची शक्यता आहे. परंतु खराब हवामान आणि पावसामुळे पुढील सामने खेळता आले नाहीत तर कसोटी सामना रद्द ठरवण्यात येईल. कसोटी सामना निकालाशिवाय घोषित केला जाईल. अशा स्थितीत भारतीय संघाला कसोटी मालिकेचा विजेता घोषित केले जाईल. भारतीय संघाने पहिला कसोटी सामना 280 धावांनी जिंकला होता.
हेही वाचा-
कानपूर कसोटीला पावसानं झोडपलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द
जयसुर्याची जादूई फिरकी, न्यूझीलंड 88 धावांत गारद; श्रीलंकेची ऐतिहासिक कामगिरी…
सूर्याच्या नेतृत्वाखाली कोणाला मिळेल संधी? बांगलादेशविरुद्ध असा असू शकतो भारताचा टी20 संघ






