भारताविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाता येथे भारताने इंग्लिश संघाला 7 विकेट्सने पराभूत केले होते. आता मालिकेतील दुसरा सामना उद्या शनिवारी (25 जानेवारी) चेन्नईमध्ये खेळवला जाईल. सामन्यापूर्वी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हन मध्ये बदल केले आहेत. इंग्लंडने गस अॅटकिन्सनला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याच्या जागी एका अष्टपैलू खेळाडूला अंतिम अकरा संघात संधी देण्यात आली आहे.
पहिल्या टी20 मध्ये इंग्लंडला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना संघ 132 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने 12.5 षटकांत सामना जिंकला. या सामन्यात इंग्लंडचा गस अॅटकिन्सन खूप महागडा ठरला. त्याने फक्त 2 षटकांत 38 धावा दिल्या. अॅटकिन्सनची इकॉनॉमी 19 होती. आता तो चेन्नई टी20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडला आहे.
इंग्लंडने अॅटकिन्सनच्या जागी ब्रायडन कार्सला संधी दिली आहे. त्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. कार्सेने इंग्लंडकडून 4 टी20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 6 विकेट्स घेतल्या आहेत. तथापि, या दरम्यान त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्याने इंग्लंडकडून 19 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात 23 विकेट्स घेतल्या आहेत. कार्सने 78 देशांतर्गत सामने देखील खेळले आहेत. या काळात त्याने 44 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताने पहिला टी20 सामना जिंकला होता. मात्र असे असूनही टीम इंडियच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो. भारतीय संघ मोहम्मद शमीला संधी देऊ शकतो. जर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले तर रवी बिश्नोईला ब्रेक दिला जाऊ शकतो.
🚨 Team news for tomorrow’s second T20I v India
🔁 Brydon Carse comes in for Gus Atkinson
🆕 Jamie Smith has also been added to the 12 player squad pic.twitter.com/Fr4Hju00qs
— England Cricket (@englandcricket) January 24, 2025
हेही वाचा-
रोहित-रहाणे फ्लाॅप, शार्दुल ऑन टाॅप, लाॅर्ड ठाकूरची दमदार शतकी खेळी, मुंबई संकटातून बाहेर
रवींद्र जडेजाची रणजी ट्राॅफीत कहर कामगिरी, ठरला सामनावीरचा मानकरी, संघाचा एकतर्फी विजय
आयसीसीकडून मागील वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा, विराट-रोहितला जागा नाही