भारतीय महिला संघ शनिवारी (9 डिसेंबर) इंग्लंड महिला संघापुढे अगदीच दुबळा दिसला. उभय संघांतील टी-20 मालिकेचा दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. भारताला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. इंग्लंडने घेतलेला हा निर्णय अगदी योग्य ठरला. भारतीय संघ 16.2 षटकात 80 धावा करून सर्वबाद झाला.
भारतीय संघासाठी या सामन्यात सलामीवीर सेफाली वर्णा आणि स्मृती मंधाना अनुक्रमे शुन्य आणि 10 धावा करून बाद झाला. कर्णधार हसमनप्रीत कौर 9 धावांवर बाद झील. पाचव्या क्रमांकावर आलेली दीप्ती शर्मा हिनेही शुन्यावर विकेट गमावली. चौथ्या क्रमांकावर खेळताना यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष अवघ्या 4 धावा करू शकली. पूजा वस्त्राकर 6 आणि श्रेयांका पाटील 4 धावा करून बाद झाला. वरच्या फळीत एकटी जेमिमाह रॉड्रिग्ज 30 धावांची खेळी करू शकली. तळातील फलंदाजांपैकी तीतस साधू 8, तर शिखा वर्मा 2 धावांवर बाद झाली.
इंग्लंडसाठी चार्ली डीन हिने 4 षटकात 16 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. लॉरेन बेल हिने 3 षटकात 18 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. सोफी एक्लेस्टोन हिने 3.2 षटकात 13 धावा दिल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. सारा ग्लेन हिनेही 3 षटकात अवघ्या 13 धावा दिल्या आणि 2 विकेट्स नावावर केल्या. नेट सायव्हर ब्रंट (15) आणि फ्रेया कॅम्प (2) यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (IND vs ENG 2nd T2oi India women bowled out for just 80 runs)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), श्रेयंका पाटील, तीतस साधू, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, सायका इशाक.
इंग्लंड – सोफिया डंकले, डॅनी व्याट, ऍलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हेदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (डब्ल्यूके), फ्रेया कॅम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, चार्ली डीन, लॉरेन बेल.
महत्वाच्या बातम्या –
कोण आहे ‘ही’ सलामी फलंदाज? WPL लिलावात केले 10 लाखांचे 1.30 कोटी
दुसऱ्या टी20त टॉस भारताच्या विरोधात, इंग्लिश कर्णधाराने निवडली प्रथम गोलंदाजी, पाहा प्लेइंग 11