---Advertisement---

INDvsENG : प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश; पण तिकीट विक्रीवेळीच उडालेत नियमांचे तीन-तेरा

---Advertisement---

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये जाऊन प्रत्यक्षात सामना पाहण्यासाठी उत्सुक होते. अशातच भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे आणि मुख्य म्हणजे हा सामना प्रेक्षकांना मैदानात येऊन प्रत्यक्ष पाहता येणार आहे. बीसीसीआय तर्फे ५०% प्रेक्षकांना मैदानात येऊन सामना पाहण्याची अनुमती देण्यात आली आहे. परंतु प्रेक्षकांना सामाजिक अंतर राखणे आणि सामना पाहताना देखील मास्कचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. अशातच क्रिकेट चाहत्यांनी एमए चिदंबरम स्टेडियम बाहेर गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आहे.

तामिळनाडू क्रिकेट संघाने जाहीर केले होते की भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याचे तिकीट उपलब्ध झाले आहेत. यानंतर क्रिकेट चाहत्यांनी क्रिकेटबद्दलचे प्रेम दर्शवत एमए चिदंबरम स्टेडियम बाहेर तिकीट मिळविण्यासाठी लांबच लांब रांग लावली होती. अशातच क्रिकेट चाहत्यांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता यावर काय उपाययोजना केली जाणार हे पाहावे लागेल.

तिकिटांची विक्री ही ऑनलाइनच झाली आहे, परंतु तिकीट घेण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियम बाहेर यावे लागत आहे. यामुळेच प्रेक्षकांची एकच झुंबड उडाली आहे. तामिळनाडू क्रिकेट संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, “ऑनलाईन बुक केलेलं तिकीट ११ फेब्रुवारीपासून तिकीट खिडकीवर मिळेल.”

असा असू शकतो दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय कसोटी संघ

इंग्लंड संघाने भारतीय संघावर पहिल्या कसोटी सामन्यात २२७ धावांनी विजय मिळवला होता. अशातच भारतीय संघाला आव्हान कायम ठेवण्यासाठी दुसरा कसोटी सामना जिंकावाच लागणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडेच असेल. तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणे सांभाळेल.

सलामीसाठी शुबमन गिल उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने तो संघात कायम असेल. तर दुसरीकडे मागील काही सामन्यात मोठी कामगिरी करण्यास अपयशी ठरलेला रोहित शर्माला आणखी एक संधी मिळू शकते. तसेच चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत हे मध्यक्रमात कायम असतील. तर गोलंदाजीसाठी संघात वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे असू शकतात. तसेच मागच्या सामन्यात गोलंदाजी करण्यात अपयश आलेल्या शाहबाज नदीम याच्या जागे अक्षर पटेल याला संघात संधी मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या –

भज्जी, केदारसह ‘या’ खेळाडूंसाठी पडणार पैशांचा पाऊस; हजार-लाख नव्हे तर २ कोटींपासून सुरू होणार बोली

अखेर आयपीएल खेळायचे स्वप्न तुटले; ‘या’ कारणामुळे श्रीसंतला लिलावासाठी मिळाले नाही स्थान?

INDvENG : दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळपट्टी पार पाडणार महत्त्वाची भूमिका?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---