इंडियन प्रीमियम लीग (आयपीएल) २०२१ च्या आधी १८ फेब्रुवारीला मिनी लिलाव होणार आहे. या लिलावापुर्वी बीसीसीआयने आयपीएलच्या लिलावासाठी २९२ खेळाडूंची अंतिम निवड केली आहे. यावर्षी १११४ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती. पण त्यातील २९२ खेळाडूंचीच अंतिम निवड झाली आहे. नोंदणी केलेल्या खेळाडूंच्या यादीत आयपीएलच्या २०१३ च्या हंगामात स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला श्रीसंत देखील होता. मात्र, त्याला लिलावासाठी अंतिम निवड झालेल्या खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही.
त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटममध्ये परतण्याची आशा असणाऱ्या श्रीसंतच्या पदरी अखेर निराशा पडली. मागील महिन्यात झालेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतून तो भारतीय क्रिकेटमध्ये परतला होता.
आयपीएल २०१३ च्या हंगामावेळी आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहभाग असल्यामुळे त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. परंतु, न्यायालयीन लढ्यानंतर ती शिक्षा सात वर्षे करण्यात आली. या सातवर्षांच्या बंदी नंतर तो पुन्हा घरगुती क्रिकेटमध्ये परतला होता आणि त्याने आयपीएलसाठी देखील नोंदणी केली होती, परंतु बीसीसीआयने त्याला लिलावसाठी निवडले नाही.
बीसीसीआयने न निवडल्याचे कारण
३८ वर्षाच्या या गोलंदाजाला टी२० क्रिकेट आवडत पण आकडेवारीनुसार तो अद्यापही हवा तसा मॅचमध्ये फिटनेस साध्य करू शकलेला नाही. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील तितकेच महत्त्वाचे असून इतक्या महिन्यांनी तो परतत असल्याने क्षेत्ररक्षणात तो कितपत चांगला असावा असा प्रश्न असल्याने त्याची निवड लिलावासाठी झालेली नसावी.
सय्यद अली मुश्ताक स्पर्धेतून क्रिकेटमध्ये परतला
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सात वर्षीच्या बंदीचा सामना करावा लागलेला श्रीसंत नुकताच सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतून क्रिकेटमध्ये परतला होता आणि त्याला केरळच्या संघात स्थान दिले होते. त्याला अपेक्षा होती की तो देशांतर्गत क्रिकेटच्या माध्यमातून आयपीएलमध्ये परतेल आणि त्यांनतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. तथापी बीसीसीआयने त्याच्या आशेवर पाणी फेरले.
श्रीसंतने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत ५ सामने खेळले असून त्यात आपला योग्य असा ठसा त्याला उमटविता आला नाही. या स्पर्धेतील ५ सामन्यात त्याला ४ विकेट्स मिळाले तर दोन सामन्यात विकेट्सचा रकाना रिकामी होता. इतकेच नव्हे तर श्रीसंतच्या गोलंदाजीमध्ये देखील त्याच्या चेंडूला वेग आणि योग्य दिशेची धार दिसून आली नाही. त्यामुळे आयपीएलचा चौदावा हंगाम जर भारतात खेळला गेला तर फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर अतिरिक्त वेगाची आवश्यकता असेल जी त्याच्याकडे नाही.
आयपीएलच्या ह्या मिनी लिलावासाठी भारताची भिंत म्हणून ओळखल्या जाणारा चेतेश्वर पुजारा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन यांचा या लिलावात समावेश केला गेला आहे. पुजाराची आधारभूत किंमत ५० लाख असून लाबुशेन याच्या नावाची बोली १.५ कोटीपासून पुढे सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvENG : दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळपट्टी पार पाडणार महत्त्वाची भूमिका?
पंतच्या जबरा फलंदाजीने डगमगडला इंग्लिश गोलंदाजाचा विश्वास, क्रिकेट सोडण्याचे बनवले होते मन
खो-खो खेळाडूंच्या प्रगतीसाठी ‘अशी’ लढवली शक्कल, वैज्ञानिक विश्लेषण शिबिराचे आयोजन






