भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणममध्ये सुरू होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघात काही महत्वाचे बदल केले गेले आहेत. रविंद्र जडेजा आणि केएल राहुल यांना इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत केळता येणार नाहीये. बीसीसीआयकडून या दोघांची जागा भरून काढण्यासाठी तीन खेळाडूंना संघात घेतले गेले आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागच्या काही वर्षांपासून धावांचा पाऊस पाडणारा सरफराज खान (Sarfaraz Khan) अखेर भारतीय संघात सामील झाला आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी मिळू शकते. वॉशिंगटन सुंदर आणि सौरभ कुमार यांना दुसऱ्या कसोटीसाठी संघात घेतले गेले आहे.
– No Virat Kohli.
– No Ravindra Jadeja.
– No KL Rahul.
– No Mohammed Shami.India will be without 4 main players in the 2nd Test vs England. pic.twitter.com/8WAXOJYByx
— Johns. (@CricCrazyJohns) January 29, 2024
WELCOME TO INDIAN TEST TEAM, SARFARAZ KHAN…!!! 🇮🇳
– After all the hard work, Sarfaraz finally gets his maiden call up. pic.twitter.com/MX4W2Foa38
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 29, 2024
पहिल्या कसोटीच्या शेटवच्या डावात रविंद्र जडेजा धावबाद झाला. विकेट वाचवण्यासाठी जडेजाने पूर्ण प्रयत्न केला, पण आपली विकेट वाचवू शकला नाही. यादरम्यानच त्याच्या हॅमस्ट्रिंगमध्ये तान आल्याचे बोलले जात आहे. लाईव्ह सामन्यात जडेजा वेदनेत दिसला होता. याच कारणास्तव 2 फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून जडेजा बाहेर होऊ शकतो. दुसरीकडे केएल राहुल देखील दुसऱ्या कसोटीतून बाहेर होणार आहे. राहुलच्या क्वाड्रिसेप्समध्ये वेदाना होत अशल्याचे सांगितले जात आहे.
बीसीसीआयने अधिकृत प्रेस रिलीजमध्ये सांगितले आहे की, “मेडिकल टीम जडेजा आणि राहुल या दोघांवर लक्ष ठेवून आहे. पण दुसर्या कसोटीआधी त्यांची रिकवरी अवघड दिसथ आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू दसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाहीत. जडेजा आणि राहुलच्या जागी सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंगटन सुंदर यांना संघात घेतले गेले आहे.” (IND vs ENG 2nd Test Ravindra Jadeja and Jasprit Bumrah ruled out of second Test)
महत्वाच्या बातम्या –
हैदराबाद कसोटीत जसप्रीत बुमराहची सरकली, त्रिफळा ऊडवून घेतला बदला, वादाचा Video पाहाच
WTC । हैदराबदमधील पराभव पडला महागात! अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत फेरबदल