IND vs ENG 3rd Test : उद्यापासून भारत-इंग्लंड तिसरी कसोटी राजकोट येथे सुरू होणार आहे. तसेच 10-12 दिवसांच्या ब्रेकनंतर होत असलेल्या या कसोटीत दोन्ही संघांची रणनीती नेमकी काय असेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. लोकेश राहुलने माघार घेतल्याने भारतीय संघात युवा फलंदाजाचे पदार्पण होईल, असा अंदाज आहे. त्यात आज खेळपट्टी पाहून इंग्लंडने मोठा निर्णय घेतला आहे. राजकोटची खेळपट्टी पाटा असल्याने इंग्लंडच्या संघाने वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबरोबरच, तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे. तसेच इंग्लंडने संघात एक बदल केला असून फिरकी गोलंदाज शोएब बशीरला प्लेइंग 11 मधून बाहेर केलं आहे.
सोशल मीडिया अकाऊंटवर इंग्लंड क्रिकेट बोर्डने याबाबात माहिती दिली आहे. तसेच या या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मार्क वुडला संघात स्थान दिलं गेलं आहे. वुड हा संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. याबरोबरच, फिरकी गोलंदाज शोएब बशीरला विश्रांती दिली गेली आहे. हा कसोटी सामना बेन स्टोक्ससाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा त्याच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असणार आहे.
दरम्यान, इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात शोएब बशीरला संघाबाहेर ठेवलं आहे. तसेच या सामन्यातही झॅक क्रॉली आणि बेन डकेट ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येईल. तर शानदार फॉर्ममध्ये असलेला ओली पोप चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पहायला मिळेल. याबरोबरच, शोएब बशीरने त्याच्या डेब्यू कसोटीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माची विकेट घेतली होती.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे इंग्लंडची प्लेइंग 11 :
झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
- Ranji Trophy : कुलवंत खेजरोलियाने रणजी ट्रॉफी स्पर्धेत 4 बॉलमध्ये उडवली 4 दांडकी, असा कारानामा करणारा फक्त तिसरा गोलंदाज
- Ranji Trophy : ईशान-श्रेयसबाबत बीसीसीआयला जाग! रणजी ट्रॉफी खेळणे केले अनिवार्य…