IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आजचा चौथा दिवस आहे. सामना रोमांचक मोडवर पोहोचला आहे. तसेच टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला होता. याबरोबरच सध्या भारताचा दुसरा डाव 430 धावांवर घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे इंग्लंडला 557 धावांचे लक्ष मिळाले आहे.
याबरोबरच टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि डेब्युटंट मुंबईकर सरफराज खान याने इतिहास रचला आहे. सरफराज याने आपल्या कसोटी कारकीर्दीची अविस्मरणीय सुरुवात केली आहे. सरफराजने कसोटी पदार्पणात इंग्लंड विरुद्ध सलग दुसरं अर्धशतक ठोकलं आहे. सरफराज खानने 65 बॉलमध्ये 5 चौकार आणि 1 सिक्स ठोकत हे अर्धशतक झळकावलं आहे.
तसेच शस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी तडाखेदार द्विशतक ठोकलं आहे. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील आणि इंग्लंड विरुद्धचं हे दुसरं द्विशतक ठरलं आहे. यशस्वीने हे दोन्ही द्विशतकं इंग्लंड विरुद्धच्या याच कसोटी मालिकेत झळकावली आहेत.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
- इंग्लिश मीडियाची रूटच्या रिव्हर्स स्कूप शॉटवर ताशेर म्हणाले, ‘इंग्लिश क्रिकेटमधील सर्वात मूर्ख…
- दुर्दैवी! फक्त एक चुक अन् शतकाजवळ पोहचलेला गिल झाला रन-आऊट, पाहा व्हिडीओ