जो रुट याने रांची कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी शानदार शतक केले. इंग्लंडने या सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सुरुवातीच्या पाच विकेट्स पाहुण्यांनी स्वस्तात गमावल्या. सहाव्या विकेटसाठी मात्र रुट आणि बेन फोक्स यांच्यात शतकी भागीदारी झाली. रुटने जून 2023 नंतर शुक्रवारी पहिल्यांदा कसोटी शतक केले. याचे श्रेय काही अंशी कर्णधार बेन स्टोक्स यालाही दिले पाहिजे.
इंग्लंडने भारताविरुद्धच्या रांची कसोटी सामन्यात पहिल्या डावात 353 धावा केल्या. या धावा करण्यासाठी त्यांनी 104.5 षटके खेळून काढली. पहिल्या दिवसाखेर इंग्लंडची धावसंख्या 7 बाद 302 धावा होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (24 फेब्रुवारी) पहिल्याच सत्रात इंग्लंडने राहिलेल्या तीन विकेट्स देखील गमावल्या. जो रुट 122* धावांसह खेळपट्टीवर कायम राहिला. रूट मागच्या काही महिन्यांपासून धावा करताना झगडत होता. पण शुक्रवारी त्याने शतक करत पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला.
रुटच्या या शतकामागे सहकारी खेळाडू बेन स्टोक्स याला हात असल्याचे दिसते. कारण खेळपट्टीवर येतानाच बेन स्टोक्सने त्याच्याकडून शतक करण्याचा शब्द घेतला होता. रुटने शुक्रवारी कारकिर्दीतील 31 वे शतक केल्यानंतर स्टॅन्डसमधून स्टोक्स रुटकडे पाहून पिंकी प्रॉमिस पूर्ण झाल्याचा इशारा केला. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
A pinky promise between Joe Root and Ben Stokes. pic.twitter.com/jQRl86UJ1l
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 23, 2024
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या डावात इंग्लंडसाठी रुटसह ओली रॉबिन्सन यानेही 58 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. झॅक क्रॉली 42, तर जॉनी बेअरस्टो 38 धावा करून तंबूत परतले. भारतीय संघासाठी रविंद्र जडेजा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात आकाश दीप याला 3 महत्वपूर्ण विकेट्स मिळाल्या. मोहम्मद सिराज यानेही दोन विकेट्स घेतल्या. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला या डावात एकाच विकेटवर समाधान मानावे लागेल. (IND vs ENG 4th Test Joe Root fulfilled his pinky promise to Ben Stokes by scoring a century)
रांची कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन
भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप (पदार्पण), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
WPL 2024 च्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ठेवले मुंबई इंडियन्स पुढे 172 धावांचे लक्ष
WPL 2024 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय