IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यामधील अखेरचा कसोटी सामना हा धर्मशाळा होणार आहे. तसेच हा सामना 7 ते 11 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तर रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडची धुरा आहे. भारतीय संघाने रांचीतील चौथ्या सामन्यासह मालिका जिंकली आहे. तसेच भारतीय संघ या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आता भारतीय संघ पाचव्या सामन्यात विजय मिळवून मालिका एकतर्फी फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
कारण इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीआधी केएल राहुल दुखापतीमुळे पाचव्या कसोटीत खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार,केएल राहुल पूर्णपणे फिट नाही. केएल उपचारांसाठी लंडनला रवाना झाला आहे. केएल अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे केएल लंडनमधील तज्ज्ञाकडून सल्ला घेत आहे. त्यामुळे तो पाचव्या कसोटीत दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
याबरोबरच, केएल राहुल हैदराबादमधील पहिल्या कसोटीत खेळला होता. मात्र त्यानंतर केएलला दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. तसेच दुसरीकडे संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहला रांची कसोटीत विश्रांती दिली होती. मात्र आता त्याचा धरमशाला कसोटीत संघात समावेश करण्यात आला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1763125455375466681
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.
इंग्लंडचा संघ – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, डॅनियल लॉरेन्स आणि गेस ऍटकिन्सन.
महत्वाच्या बातम्या –