---Advertisement---

IND vs ENG: बेन स्टोक्स पाचव्या टेस्टमधून बाहेर! या 3 खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

On: बुधवार, जुलै 30, 2025 4:24 PM
---Advertisement---

पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. बेन स्टोक्स दुखापतीमुळे ओव्हल टेस्टमध्ये खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व ओली पोपकडे सोपवण्यात आले आहे. स्टोक्सच्या जागी जेकब बेथेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. तसेच लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स यांना प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान मिळालेलं नाही. पाचव्या कसोटी सामन्याची सुरुवात 31 जुलैपासून ओव्हलमध्ये होणार आहे. इंग्लंड सध्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.

इंग्लंडला पाचव्या टेस्ट सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे ओव्हल टेस्टमधून बाहेर पडला आहे. उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे स्टोक्सला शेवटच्या टेस्ट सामन्यातून बाहेर रहावं लागणार आहे. या अखेरच्या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

स्टोक्सच्या जागी जेकब बेथेलला संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि ब्रायडन कार्स यांना संघाबाहेर करण्यात आलं आहे. या तिघांच्या जागी अंतिम अकरामध्ये गस एटकिन्सन, जेमी ओव्हर्टन आणि जोश टंग यांना संधी देण्यात आली आहे. एकंदरीत, इंग्लंडने पाचव्या टेस्टसाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार मोठे बदल केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---