---Advertisement---

IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का! संघातील मॅचविनर गोलंदाज कसोटी मालिकेतून बाहेर

---Advertisement---

IND vs ENG :  सध्या भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना हा राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच इंग्लंडला मोठा हादरा बसला आहे. कारण, संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतग्रस्त झाला असून तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात जॅक लीचने महत्त्वाची भूमिका बजावत त्याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात प्रत्येकी एक विकेट घेतली होती. या सामन्यादरम्यान लीचला क्षेत्ररक्षण करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. याच कारणामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही. आणि आता संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.

याबरोबरच, लीचच्या दुखापतीमुळे इंग्लंडला खूप नुकसान होणार असून भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटू खूप महत्त्वाचे ठरत असतात. तसेच, इंग्लंडचा हेड कोच ब्रेंडन मॅक्क्युलमने आपला प्लान सांगितला होता. ज्यात त्याने ४ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरणार असा उल्लेख केला होता. मात्र सामन्यापूर्वीच त्यांचा हा प्लान फसल्याचं दिसून येत आहे.

याबरोबरच, जॅक लीचने इंग्लंडसाठी अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 36 कसोटी सामन्यांमध्ये 126 बळी घेतले आहेत. तर लीचची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे ६६ धावांत ५ बळी आहेत. तसेच त्याने 139 प्रथम श्रेणी सामन्यात 434 विकेट घेतल्याअसून 85 धावांत 8 बळी ही एका डावातील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

दरम्यान, जॅक लीच हा इंग्लंडचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. तसेच इंग्लंडने अद्याप त्याच्या बदलीची घोषणा केलेली नसून कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने त्याचा पराभव केला होता. यामुळे ही मालिका आता एक-एक बरोबरीत आली आहे. तर मालिकेतील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

U19 IND vs AUS Final : अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये महाराष्ट्रातील खेडचा अंपायर, कोण आहे तो? वाचा सविस्तर

IND vs ENG । दुखापत की खराब फॉर्म? जाणून घ्या श्रेयस अय्यर संघातून बाहेर पडण्याचे खरे कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---