भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्यांच्या धावसंख्येच्या जवळ जाण्याकडे भारताचे लक्ष असेल. तसेच या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 353 धावा फलकावर लावल्या आहेत.अनुभवी फलंदाज जो रूटने शतक ठोकत इंग्लंड संघाला ही धावसंख्या गाठण्यात मोलाचा वाटा उचलला. या धावसंख्येसमोर भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 219 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या.
त्यानंतर कठीण काळात आलेल्या ध्रुव जुरेलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक 96 चेंडूत झळकावले आहे. भारताच्या आशा आता त्याच्यावरच आहेत. जुरेलने या डावात त्याने सहा चौकार आणि चार गगनचुंबी षटकार मारले आहेतh. याबरोबरच भारतीय संघ पहिल्या डावात संघर्ष करताना दिसला आणि आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. रोहित शर्मा, शुबमन गिल, रजत पाटीदार, रवींद्र जडेजा आणि सर्फराज खान अशी मोठी नावे धावा करण्यात अपयशी ठरले आहेत.
याबरोबरच या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 353 धावा फलकावर लावल्या आहेत.अनुभवी फलंदाज जो रूटने शतक ठोकत इंग्लिश संघाला ही धावसंख्या गाठण्यात मोलाचा वाटा उचलला. भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला आहे. त्यामुळे आता इंग्लंडला दुसऱ्या डावात 46 धावांच्या आघाडी मिळाली आहे.
The fifty appreciation from the captain Rohit Sharma for Dhruv Jurel. pic.twitter.com/nMyBmqeP6j
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 25, 2024
दरम्यान, भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज लवकर आऊट झाल्यानंतर इंग्लंडचा संघ मोठी आघाडी घेईल असे वाटत होते. पण ध्रुव जुरेलने आपली ताकद दाखवून दिली. रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी 96 चेंडूंचा सामना करत त्याने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने अर्धशतक झळकावले. यावेळी त्याने कुलदीप यादवसोबत 76 धावांची मौल्यवान भागीदारी केली आणि धावसंख्या 250 धावांच्या पुढे नेले आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.
महत्वाच्या बातम्या –