भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आयपीएलचा तारीख जाहीर होताच प्रकाश झोतात आला आहे. आयपीएलचा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णदार बनवलं आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम वादळी होणार अशी शक्यता आहे. तसेच हार्दिक पंड्या 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता, त्यानंतर तो अद्याप मैदानात परतला नाही. या स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. विश्वचषकानंतर टीम इंडियाने पांढऱ्या चेंडूंच्या अनेक मालिका खेळल्या, पण पंड्या यापैकी एकाही मालिकेत पुनरागमन करू शकला नाही.
मात्र आता सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहे. तसेच चाहत्यांनी त्याला पाहण्याचा आनंद देखील घेतला आहे. तसेच भारतीय अष्टपैलू खेळाडूला क्रिकेटच्या मैदानावर भलेही दमदार पुनरागमन करता आले नसले तरी रस्त्यावरील क्रिकेटमध्ये त्याने पुनरागमन केले आहे.
याबरोबरच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक मुंबईतील चाहत्यांसोबत रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहे. यावेळी हार्दिकसोबत प्रसिद्ध समालोचक जतीन सप्रूही पहायला मिळत आहे. तसेच व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या हातात बॅट पकडताना दिसत आहे. जतीन सप्रूच्या हातात चेंडू दिसत आहे. यावेळी, गर्दीने हार्दिक पांड्याला चारही बाजूंनी घेरले असून अनेक लोक हार्दिकचे व्हिडिओ बनवत आहेत.
Hardik Pandya playing cricket with fans in Mumbai. pic.twitter.com/1MaRG46ub3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 24, 2024
दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका युजरने गंमतीने लिहिले की, “मला आशा आहे की या सामन्यात त्याला दुखापत होणार नाही.” आणखी एका यूजरने लिहिले की, “वास्तविक चाहते स्टेडियममध्ये वाट पाहत आहेत.” आणखी एका यूजरने लिहिले की, “तो आजकाल भारतीय क्रिकेटसाठी खेळण्याशिवाय सर्व काही करत आहे.” तसेच चाहत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –