श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तान संघाने निसटता विजय मिळवला. 210 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेला यजमान श्रीलंकन संघ 20 षटकात 206 धावांपर्यंत मजल मारू शकला. असे असले तरी, श्रीलंकने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशा विजय मिळवला. बुधवारी (21 फेब्रुवारी) लाईव्ह सामन्यात वानिंदू हसरंगा आणि मैदानातील पंचांमधील वाद आता चर्चेचा विषय ठरत आहे.
याबरोबरच, शनिवारी संध्याकाळी मोठा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार वानिंदू हसरंगा याला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर आयसीसीने अफगाणिस्तानचा खेळाडू रहमानउल्ला गुरबाजलाही शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे हसरंगाला पुढील दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
Sri Lanka star handed two-match suspension for breaching ICC Code of Conduct.https://t.co/eWyf4kybza
— ICC (@ICC) February 24, 2024
श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना यजमान संघाने 3 धावांनी गमावला. मालिका नावावर झाली, पण तिसऱ्या सामन्यातील पराभव श्रीलंकेसाठी वेदानादायक होता. याच सामन्यात पंचांच्या एका निर्णयावर श्रीलंकन संघ नाराज दिसला. पंचांनी कंबरेच्या वरील चेंडूला नो बॉल दिले नाही, म्हणून वानिंदू हसरंगा चांगलाच संतापल्याचे दिसले. हाच राग सामना संपल्यानंतर देखील कमी झाला नव्हता. माथ्यमांशी बोलताना हसरंगा असे काही बोलला, जे वेगात व्हायरल होत आहे.
उभय संघांतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंकन संघ फलंदाजी करत होता. कामिंडु मेंडिस खेळपट्टीवर होता. त्यावेळी गोलंदाजाकडून एक जास्त उंचीचा फुलटॉस चेंडू टाकला गेला. पण तरीही पंच लिंडन हॅनिबल यांनी नो बॉल दिला नाही. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकन कर्णधार हसरंगा संतापला. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा गोष्टी व्हायला नको आहेत. जर चेंडू कंबरेपेक्षा खाली असता, तर काहीच अडचन नव्हती. पण जो चेंडू कंबरेच्या वरती होता, त्याला नो बॉल दिला नाही. असे पंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कमाचे नाहीत. त्यांनी दुसरे काम शोधले तर बरे होईल.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघ 20 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर 209 धावांपर्यंत पोहोचला. प्रत्युत्तरात श्रीलंका संघ 20 षटकात 6 विकेट्सच्या नुकसानावर 206 धावांपर्यंत मजल मारू शकला. श्रीलंकेसाठी निशांका 60 आणि कामिंडु मेंडिस 65 धावा करू शकले. शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाढी 19 धावा हव्या होत्या. पण शेवटच्या सहा चेंडूत श्रीलंकेला 16 धावा मिळाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या –
- WPL 2024 : रिचा घोषचा तडाखा! RCB ने युपी वॉरियर्सला दिले 158 धावांचे लक्ष
- WPL 2024 : 4,4,4,4,4,6,6… रिचा घोषचा तडाखा अन् युपी वॉरियर्सची डोकेदुखी वाढली