भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची नजर सामन्यावरील पकड मजबूत करण्यावर असेल. य़ाआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 326 धावा केल्या होत्या.
तसेच, या सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत आहे. रवींद्र जडेजा आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी भारतासाठी कर्णधारपदाची खेळी खेळली आहे. याबरोबरच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने एक मोठी चूक केली आहे. तसेच याचे परिणाम संपूर्ण संघाला भोगावे लागणार आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविचंद्रन अश्विन फलंदाजी करत असताना 102 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अश्विनने ही चूक केली. यासाठी पंचांनी भारतीय संघावर 5 धावांचा दंड आकारला आहे.
Five penalty runs have been awarded to England 👀#INDvENG #India #England #RavichandranAshwin #CricketTwitter pic.twitter.com/iDLa5DQQL5
— Jega8 (@imBK08) February 16, 2024
घ्या जाणून पंचांनी भारतीय संघावर 5 धावांचा दंड का आकारला
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा गोलंदाज रेहान अहमद 102 वे ओव्हर टाकायला आला होता. यावेळी अहमदच्या षटकातील चौथ्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने चेंडूवर फटका खेळत एकेरी धाव घेतली. तेव्हा अश्विनने खेळपट्टीच्या मधून धावायला सुरुवात केली होती. तसेच कोणत्याही खेळाडूला विकेटसमोर धावण्याची परवानगी नाही, यामुळे खेळपट्टीचे नुकसान होते. असे असूनही, अश्विनने एक धाव घेण्यासाठी खेळपट्टीच्या मध्यभागी धावायला सुरुवात केली, त्यामुळे पंच जोएल विल्सन यांनी भारतीय संघावर 5 धावांचा दंड आकारला आहे.
3⃣5⃣0⃣ up for #TeamIndia! 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5pje#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/rsokBR2y06
— BCCI (@BCCI) February 16, 2024
याबरोबरच, जेव्हा इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरेल तेव्हा त्यांना धाव फलकावर 5 धावा मोफत मिळणार आहेत. अशा परिस्थितीत अश्विनची एक छोटीशी चूक संपूर्ण संघाला महागात पडली आहे. तसेच हा सामना जिंकणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर हा सामना जो संघ जिंकेल तो मालिकेत 2-1 अशी आघाडी घेईल.
Centuries from Jadeja (110*) and Rohit Sharma (131) guide #TeamIndia to 326/5 at Stumps on Day 1 of the 3rd Test.
Scorecard – https://t.co/eYpzVPnUf8 #INDvENG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/KVSDlNKmQG
— BCCI (@BCCI) February 15, 2024
दरम्यान, अश्विन कसोटी मालिकेत एक इतिहास करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. तसेच अश्विनने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 499 विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत राजकोट कसोटीत एक विकेट घेऊन अश्विन कसोटीतील 500 विकेट पूर्ण करेल. अश्विनशिवाय अनिल कुंबळे हा एकमेव भारतीय खेळाडू आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळींचा टप्पा ओलांडला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : सरफराज खानने पदार्पणातच अनिल कुंबळेच्या विक्रमाची केली बरोबरी, रेकॉर्ड जाणून व्हाल थक्क
- पदार्पणातच सर्फराज खान आणि नंतर ध्रुव जुरेल, राहुल द्रविडने त्यांना फलंदाजी करण्यापासुन का रोखले, घ्या जाणून